Shocking News Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking News: दुर्दैवी! सासूच्या निधनाचा धक्का, अंत्यसंस्कारावेळी सुनेनंही सोडले प्राण, मन सुन्न करणारा VIDEO

Himachal Pradesh Tragic Incident News: हिमाचल प्रदेश येथे धक्कादायक घटना घडली आहे. सासूच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारावेळीच सुनेचाही मृत्यू झाला. या दुहेरी मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे.

Manasvi Choudhary

हिमाचल प्रदेश हमीरपूर येथून धक्कादायक घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील सासू आणि सूनेचा मृत्यू झाला आहे. सासूचे अत्यंसंस्कार करत असतानाच ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केला जात आहे. सासू आणि सुनेच्या जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

हमीरपूरच्या भोरंज उपविभाग येथील जाहू गावात सासू आणि सुनेच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे. सासू दामोदरीच्या मृत्यूनंतर हृदय विकार असलेल्या सुनेचाही मृत्यू झाला आहे. अत्यसंस्कारावेळी सासूला पाणी पाजत असताना ही घटना घडलीये. जोरजोरात हुंदके फोडत असताना अचानक सुनेला श्वास घ्यायला त्रास होत होता.

स्थानिकांनी दिलेल्या माहतीनुसार, सासूच्या निधनाने रमेशाला मोठा धक्का बसला. रमेशा ओरडत होती. अरे आई काय झालं? असं तिने शेवटचं विचारल. मात्र दामोदर मरण पावली. रमेशाने सासूला पाणी पाजले. सर्व विधी केल्या, मात्र ज्यावेळेस सासूचे पार्थिव उचलणार तेव्हा रमेशाने जोरात हुंबरंडा फोडला. जीव गुदमरला होता. थोडा वेळा शांत झोपून होती. मात्र बराच वेळ शांत राहल्यानंतर त्यांनी रमेशाला उठवण्याचा प्रयत्न केला.

जवळपास एका तासानंतर कुटुंबियांनी रमेशाला भोरंज रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना या व्यक्तीचा मृत्यू होईन पाऊण तास झाला आहे असं सांगतिलं. या संपूर्ण घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.सर्वानी दु:ख व्यक्त केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पंढरपुरात कालव्यातील पाण्याची नासाडी

5 Potato Recipe: नवरात्रीच्या उपवासासाठी स्पेशल रेसिपी! बटाट्यापासून बनवा 5 उपवासाचे पदार्थ

Hair Fall: केसगळती आणि केस तुटण्याची समस्या होईल कमी; आठवड्यातून २ वेळा लावा हे घरी बनवा खास तेल

Navratri Fasting Recipe : नवरात्रीत उपवासाला गोड खाण्याची मजाच वेगळी, 'असा' बनवा मऊसूत रताळ्याचा शिरा

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या मोर्चाला सुरूवात, दिल्लीतील वातावरण तापले

SCROLL FOR NEXT