Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: पेट्रोल पंपावर दुचाकीवरून उतरला अन् जागेवरच धाडकन पडला, तरूणाचा जागेवरच मृत्यू, धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

Young Man Dies At Uttar Pradesh Petrol Pump: उत्तर प्रदेशातील ललितपूर येथे पेट्रोल पंपावर धक्कादायक घटना घडली. पेट्रोल भरल्यानंतर तरूण दुचाकीवरून उतरताच जमिनीवर कोसळला. प्रकृती अचानक बिघडल्याने काही मिनिटांत मृत्यू झाला.

Manasvi Choudhary

मृत्यू कधी येईल याचा कोणीही अंदाज लावू शकत नाही. उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मडवारा पोलिस स्टेशनच्या परिसरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला आहे. पेट्रोल पंपावर उभा असताना मत्यू झाला आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला. लोक देखील घाबरले.

मिळालेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती पेट्रोल पंपावर दुचाकीसह उभा होता. दरम्यान पेट्रोल भरल्यानंतर दुचाकीवरून उतरताना हा व्यक्ती चक्कर येऊन जमिनीवर पडला. सर्व लोक जमा झाले. तेथे असलेल्या लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला सीपाआर देखील दिला परंतु यश आले नाही काही मिनिटांतच व्यक्तीचा श्वास थांबला. प्रकृती अचानक बिघडल्याने जागीच मृत्यू झाला.दरम्यान या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगितलं आहे.

या संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. या अपघाताची माहिती कुटुंबाला देण्यात आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अचानक घडलेल्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs NZ playing 11 : न्यूझीलंडविरुद्ध कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन? रोहित शर्मा, विराट कोहली खेळणार का? कोण बसेल बाकावर?

Maharashtra Live News Update: विक्रोळीत शॉपिंग सेंटरला जवळच्या मीटर बॉक्सला लागली भीषण आग

निवडणुकीनंतर भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह,राजकीय वर्तुळात खळबळ

Paithani Contrast Blouse: पैठणी साडीवर कॉन्ट्रास्ट ब्लाउज कसा निवडावा? रेखीव लुकसाठी 7 महत्त्वाच्या टिप्स

Hill Station: गुलाबी थंडीत बाहेर जायचा प्लान करताय? मुंबई-पुण्याजवळ 'या' निसर्गरम्य ठिकाणाला नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT