लखीमपूर खेरीत पेट्रोल पंपावर तरुणाचा अचानक मृत्यू
डिझेल भरताना चक्कर येऊन युवक कोसळला
संपूर्ण घटना पेट्रोल पंपावरील सीसीटीव्हीत कैद
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे एक धक्कादायक घटना घडलीय. पेट्रोल-डिझेलच्या पंपावर कारमध्ये इंधन भरतानाचा युवकाचा मृत्यू झाला. ही घटना धाखेरवा रोडवरील लखाही गावाजवळील लक्ष्मी पेट्रोल पंपावर घडली. ही संपूर्ण घटना पेट्रोल पंपावर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. हाती आलेल्या माहितीनुसार, मसरूर खान असं मृत पावलेल्या व्यक्तीचं नाव आहे. मसरूर खान पडुआ पोलीस स्टेशन परिसरातील बिनोरा गावातील रहिवासी होता.
28 वर्षीय मुलगा मसरूर खान हा डिझेल भरत असताना गाडीतून उतरला. गाडीची काच साफ करू लागला. त्याचवेळी त्याला अचानक चक्कर आली आणि तो कोसळला. पंपावर उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला निघासन येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी सीएचसीच्या आपत्कालीन विभागातील डॉ. टीएन म्हणाले, तरुण रुग्णालयात मृतावस्थेत पोहोचला होता. त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला होता, त्यात त्याचा मृत्यू झाला.
बिनोरा गावातील रहिवासी नंबरदार आपल्या कुटुंबासह राहत होता. त्याला चार मुले होती: मसरूर (28), मसरूर (24), मुसीफुल (22) आणि सुफियान (20). त्याचे वडील शेती करतात. तर त्याचा मोठा मुलगा मसरूर कार ड्रायव्हर होता. रविवारी, मसरूर एका लग्नाला जात होता. त्यावेळी तो लक्ष्मी पेट्रोल पंपावर त्याच्या गाडीत डिझेल भरण्यासाठी थांबला होता. त्यावेळी कारची विंडशील्ड साफ करत होता. त्याने पंपावरील कर्मचारीला डिझेल भरण्यास सांगितले.
त्याचवेळी तो अचानक जमिनीवर कोसळला आणि काही सेकंदातच त्याचा मृत्यू झाला. तरुणाला चक्कर येऊन खाली पडल्यानं पेट्रोल पंपावर गोंधळ उडाला. उपस्थित लोकांनी त्याला ताबडतोब निघासन सीएचसीमध्ये नेलं. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.