Mumbai Crime News Saam Tv
व्हायरल न्यूज

Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये चाललंय काय? महिला डब्ब्यात अज्ञात व्यक्तीने काचेची बॉटल फेकली; अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी

Shocking Video Mumbai Local: सोशल मीडियावर वारंवार मुंबई लोकल ट्रेनचे असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र पुन्हा एकदा लोकल ट्रेनमधील धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे.

Tanvi Pol

Local Train Video: मुंबई लोकल ट्रेन ही लाखो मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा एक अविभाज्य भाग आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनमधील असुरक्षितता वाढताना दिसत आहे. अशीच एक धक्कादायक घटना नुकतीच टिटवाळा ट्रेनमध्ये घडली, ज्यात भरधाव ट्रेनमध्ये अज्ञात व्यक्तीने दारुची बाटली फेकली आणि त्यातील एक अल्पवयीन मुलीला लागली. या संपूर्ण घटनेमुळे पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण घटना मंगळवारी (दि.११ मार्च) रोजी रात्री साधारण ८.३० वाजता टिटवाळा लोकल ट्रेनमध्ये घडली. दरम्यान विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ट्रेनमध्ये काचेची बाटली फेकली आणि ती बाटली पहिल्यांदा ट्रेन(Train)मधील पंख्याला लागली त्यानंतर बाटलीचे तुकडे डब्यात सर्वत्र पसरले असून त्यातील एक तुकडा अल्पवयीन मुलीला लागला.

सध्या लोकल ट्रेनमधील व्हिडिओ एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. मात्र तो एक्सवरील ''@fpjindia'' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी याबाबत चौकशी सुरू केली आहे. मात्र, ट्रेन भरधाव वेगाने असताना ही बाटली नक्की कोणी आणि कुठून फेकली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या प्रकारामुळे महिला डब्यात भीतीचे वातावरण पसरले. महिलांनी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला. मुंबई लोकल(Mumbai Local) ट्रेनमध्ये अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत आहे शिवाय यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

टीप: लोकलमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित; राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य

Maharashtra News Live Update: पनवेलमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटवर पोलिसांचा छापा

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली, संकटात नातूनेही दाखवलं धाडस

SCROLL FOR NEXT