Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video : धक्कादायक! धगधगत्या आगीत भाविकांची उडी, व्हिडिओ पाहून होईल थरकाप

Holi Rituals Fire Walking : या प्रथा पार पाडणाऱ्या व्यक्तींच्या मनात भाव आणि भक्ती असते मात्र कितीही म्हटलं तरी ही एक अंधश्रद्धा आहे. अंधश्रध्देच्या असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ruchika Jadhav

People Walk Through Fire Video :

भारतात विविध जाती धर्माचे लोक राहतात. येथे प्रत्येक सन विविध रूढी आणि परंपरेने साजरा केला जातो. काही ठिकाणी देवाला प्रसन्न करण्यासाठी बकरी किंवा कोंबडा यांचे बळी देखील दिले जातात. तर काही ठिकाणी याहून भयंकर प्रथा परंपरा पाळल्या जातात. या प्रथा पार पाडणाऱ्या व्यक्तींच्या मनात भाव आणि भक्ती असते मात्र कितीही म्हटलं तरी ही एक अंधश्रद्धा आहे. अंधश्रध्देचा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

होळी सण आता काही दिवसांवर आला आहे. सर्वत्र होळीची तयारी सुरू झालीय. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह अन्य राज्यांमध्ये देखील होळी साजरी केली जाते. या दिवशी लाकूड, सुकलेल्या झाडांची पाने, शेणाच्या गोवऱ्या सर्व एकत्र उभारले जाते. त्यानंतर त्याचे दहन केले जाते. याला होलिका दहन असे म्हणतात. याचाच एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ केरळमधील असल्याचं समजलं आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, समोर होलिका दहन सुरू आहे. लाकडी ओंडक्यांनी पेट घेतलाय. त्यात काही माणसं धावत जात आहेत. आगीच्या ज्वाळामधून काही व्यक्ती येथून जाताना दिसत आहेत. ही भयंकर प्रथा खरोखरच अघोरी आहे. या प्रथेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सदर व्यक्ती गावात सुख, शांती आणि भरभराट व्हावी यासाठी असे करतात. गावकऱ्यांची यावर श्रद्धा आहे.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये या बाबत माहिती देण्यात आली आहे. "केरळ, भारतातील श्री राजा राजेश्वरी मंदिरात हा विधी केला जातो. मंदिर परिसरातील अग्निमध्ये चालण्याचा हा सोहळा आहे. ही एक हिंदू धार्मिक प्रथा आहे जिथे देवी द्रौपदीने दिलेल्या इच्छा किंवा आशीर्वादाच्या बदल्यात भक्त अग्निकुंड ओलांडून जातात. " असे लिहिण्यात आले आहे. नेटकरी हा व्हिडिओ पाहून पुरते हैराण आहेत. या अघोरी प्रथा असल्याचं काहींनी म्हटलं आहे.

सोशल मीडियावर @bizarredoctor या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला लाखोंच्या घरात लाइक्स मिळालेत. नेटकऱ्यांनी यावर विविध कमेंट केल्यात. सदर दृश्य मन विचलित करणारी आहेत. ही भारतीय संस्कृती आहे. त्यामुळे ही फारच चकित करणारी घटना आहे, असंही काहींनी कमेंटमध्ये म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सदाभाऊ खोत यांनी केले बाळराजे पाटलांचे समर्थन

SUV 2026: फीचर्स फुल्ल, स्टाइल कमाल! मार्केटमध्ये धुमाकूळ घालायला सज्ज 5 दमदार मिड–साईज SUV; खासियत ऐकून थक्क व्हाल

Shocking: लग्नात फोटोसेशन सुरू असताना स्टेज कोसळला, नवरा-नवरी, भाजप नेत्यासह १० जण पडले; पाहा VIDEO

Solapur News: सूचना एक कानानं ऐकली दुसऱ्या कानाने सोडली; आगार प्रमुख 'ऑन द स्पॉट सस्पेंड'

Maharashtra Politics: 2 डिसेंबरपूर्वीच राजकीय भूकंपाचा ट्रेलर! शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदेंच्या स्टेजवर|VIDEO

SCROLL FOR NEXT