Sangli News Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: सांगलीत लेडी डॉनची दहशत! महिलांच्या टोळीकडून विश्रामबागमध्ये रेकी; घटना सीसीटीव्हीत कैद

Viral Video News: सोशल मीडियावर सध्या सांगली शहरातील एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.ज्यात महिलांच्या टोळीकडून चोरीसाठी रेकी केली जात असल्याचा प्रकार व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्यास मिळतोय.

Tanvi Pol

Sangli Viral Video: हार्ट ऑफ सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगली शहरातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे. ज्यात विश्रामबाग मधील एसटी कॉलनी परिसरात आणि राम मंदिर येथे पहाटेच्या सुमारास महिलांच्या टोळीकडून चोरीसाठी रेकी केली जात आहेय व्हिडिओमध्ये आठ ते दहा महिला दिसून येत असून परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आले असून पोलीस त्या टोळक्याचा लवकरच छडा लागतील.

विश्रामबाग परिसरात गेल्या काही दिवसापासून चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. विश्रामबाग येथील प्रगती कॉलनी चोरट्याने घरफोडीचा(Burglary) प्रयत्न काही दिवसापूर्वी केला होता. त्यानंतर या भागातील नागरिकांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्या टोळीचा अद्याप छडा लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

आता महिलांच्या टोळीचे दहशत निर्माण झाली आहे. या महिला मध्यरात्री रिक्षातून येतात आठ ते दहा महिला असून परिसरातील बंगल्यांची पाहणी करत आहेत. भागातील काही व्हाट्सअप ग्रुप वर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. विशेष खबरदारी घेतली पाहिजे असे मेसेज व्हाट्सअप ग्रुप वर फिरत आहेत.

तर हे सीसीटीव्ही(Cctv) फुटेज काही सजग लोकांनी विश्रामबाग पोलीससह स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलीस निरीक्षकाकडे दिले आहे. पोलीस अधीक्षक यांनी याबाबत माहिती देण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक यांनी याचा छडा लावण्याचे आदेशही पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले आहेत.

टीप : सांगलीतील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात 3 दिवसानंतर पुन्हा एकदा जोरदार पाऊस

Hypertension India: २१ कोटी भारतीयांना हाय ब्लड प्रेशरचा धोका! तिशी ओलांडलेल्या तरुणांनो व्हा सावध, WHO नेमकं काय सांगितलं?

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान दोन्हीही संघ होणार मालामाल; आशिया कप विजेत्याला किती पैसे मिळणार? जाणून घ्या प्राइस मनी!

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

SCROLL FOR NEXT