आता 700 रुपयांची नोट चलनात येणार असल्याचा दावा करण्यात आलाय...नोट कशी आहे याचाही फोटो व्हायरल करण्यात आलाय...पण, खरंच आता ही नोट चलनात येणार आहे का...? आरबीआयने अशी घोषणा केलीय का...? ही नोट चलनात येणार असेल तर कधीपासून येणार आहे...? असे अनेक प्रश्न विचारले जातायत...त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...
भारतात 700 रुपयांची नवीन नोट जारी होऊ शकते.700 रुपयांची नोट कशी दिसेल ते पाहा
ही नोट नीट पाहा...या 700 रुपयांच्या नोटेवर
हंपीचा फोटो छापण्यात आलाय...हंपी हे कर्नाटक राज्यातील युनेस्को जागतिक वारसा स्थान आहे...प्रत्येक नोटांवर असे फोटो असतात...निळ्या रंगाची नोट दाखवण्यात आलीय...यावर भारताचा नकाशाही दाखवण्यात आलाय...पण, खरंच ही नोट आता चलनात येणार आहे का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...700 ची नोट चलनात आली तर ही सर्वात मोठं चलन ठरेल...याआधी 2 हजार आणि 1 हजाराची नोट होती...मात्र, ती बंद करण्यात आली...आता 700 रुपयांची नोट येणार आहे का...? याबाबत आमच्या व्हायरल सत्य टीमने आरबीआयच्या साईटवर जाऊन माहिती तपासली...असं कुठेही नोटिफिकेशन आढळून आलेलं नाही...मग ही नोट कुठून आली...याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...
700 रुपयांची नोट चलनात येणार नाही
RBI ने 700 च्या नोटेबाबत घोषणा केलेली नाही
सोशल मीडियावरील व्हायरल फोटो खोटा
दिशाभूल करण्यासाठी एडिटेड फोटो व्हायरल
अशा खोट्या नोटांचे फोटो व्हायरल करून दिशाभूल केली जाते...मात्र, कुठेही 700 रुपयांची नवी नोट येणार अशी अधिकृत घोषणा आरबीआयने केलेली नाही...त्यामुळे आमच्या पडताळणीत आता 700 ची नोट येणार असल्याचा दावा असत्य ठरलाय...ब्यूरो रिपोर्ट साम टीव्ही
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.