QR Code Mehandi Design On Sister Hand Video Viral Saamtv
व्हायरल न्यूज

Rakshabandhan Mehandi: डिजिटल रक्षाबंधन! 'भाऊराया' पैसे देईना... ताईसाहेबांनी शोधली आयडियाची कल्पना; भन्नाट व्हिडिओ

QR Code Mehandi Design On Sister Hand Video Viral: भाऊरायाकडून पैसे उकळण्यासाठी ताईने शोधली आयडियाची कल्पना... व्हिडिओ तुफान व्हायरल

Gangappa Pujari

Sister Make QR Code Mehndi Video: बहिण भावाच्या नात्यातील गोडवा वाढवणारा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. रक्षाबंधनाला भाऊराया लाडक्या बहिणीला गिफ्ट, पैसेही देत असतो.

अनेकदा भाऊ मुद्दाम पैसे द्यायला टाळाटाळ करतो, कारणे सांगतो, पण ऐकेल ती बहिण कसली. काहीही करुन ती त्याच्याकडून पैसे उकळतेच. सध्या सोशल मीडियावरही असाच एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. काय आहे या व्हिडिओची कथा, चला जाणून घेवू. (Rakshabandhan Viral Video)

रक्षाबंधन २०२३

सध्या डिजीटलचा (Digital) जमाना आहे. प्रत्येक व्यवहार, आर्थिक देवाण- घेवाण ऑनलाईन होत असते. रक्षाबंधनाच्या (Rakshabandhan Festival 2023) सणालाही भाऊ आपल्या लाडक्या बहिणीसाठी खास गिफ्ट देत असतो. मात्र अनेकदा भाऊ पैसे द्यायला नकार देतो, सुट्टे नाहीत, पाकिट नाही अशी कारणेही देतो. आता यावरही एका ताईने भन्नाट आयडिया शोधून काढली आहे.

ताईसाहेबांची भन्नाट आयडिया...

या बहिणीने चक्क तिच्या हातावरील मेहंदीमध्ये ऑनलाईन पेमेंटची (Online Payment) सोय केली असून क्यूआर कोडचं (QR Code) हातावर कोरुन घेतला आहे. या जबरदस्त कलाकृतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडिओ व्हायरल..

व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, बहिण आपल्या भावाला मेहंदी दाखवते. मात्र भावाला हे खोटचं वाटतं. त्यामुळेच बहिण त्याला जर क्यूआर कोड स्कॅन झाला तर ५००० द्यावे लागतील.. अशी पैज लावते. आणि आश्चर्य म्हणजे हातावर काढलेला क्यूआर कोड चक्क स्कॅनही होतो. ज्यानंतर भाऊरायाला नाईलाजाने पैसे द्यावे लागतात.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया....

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकरीही चक्रावून गेले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना काही नेटकऱ्यांनी ताईच्या क्रिऍटिव्हिटीचे कौतुक केले आहे. रक्षाबंधनाला कारणे देणाऱ्या भावांसाठी हा सर्वोत्तम पर्याय असल्याच्या मजेशीर प्रतिक्रियाही काही जणांनी दिल्या आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT