Man Run naked Saam Tv
व्हायरल न्यूज

हॉटेलच्या रुममधून नग्न अवस्थेत धावत सुटला तरुण; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Man Run naked: राजस्थानच्या नागौरमधील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी आता यावर मोठा खुलासा करत त्या व्यक्तीने असे का केल्याचा खुलासा केला आहे.

Shruti Vilas Kadam

Man Run naked: राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील एका व्हायरल व्हिडिओमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली होती. एका खाजगी ट्रॅव्हल एजन्सीमधून एक तरुण नग्न अवस्थेत रस्त्यावर धावत असल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेबाबत विविध अफवा पसरवल्या जात असताना आता नागौर पोलिसांनी यावर अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे.

सोशल मीडियावर नग्न अवस्थेत धावणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल

नागौर जिल्ह्यातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये टाकलेल्या धाडीदरम्यानचा एक व्हिडिओ ऑनलाइन वेगाने पसरत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, हॉटेलच्या आवारात पोलिसांचे मोठे पथक अचानक दाखल झाल्याने घाबरलेला एक व्यक्ती कपड्यांशिवायच आपल्या खोलीतून बाहेर पडतो आणि कॉरिडॉर व रस्त्याच्या दिशेने वेगाने धावू लागतो. हे दृश्य पाहून घटनास्थळी उपस्थित पोलीस कर्मचारी आणि लोक अवाक झाले.

पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित तरुण कोणत्याही पोलीस कारवाईमुळे किंवा भीतीपोटी पळत नव्हता. तो मानसिकदृष्ट्या आजारी असून गोंधळलेल्या अवस्थेत नागौर शहरातील कृषी मंडी चौक परिसरातील एका खाजगी ट्रॅव्हल एजन्सीमध्ये मागील प्रवेशद्वारातून शिरला होता. एजन्सीतील एका खोलीत तो जाऊन बसला. कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडल्यानंतर त्यांना आत एक अनोळखी आणि नग्न अवस्थेतील तरुण दिसला.

कर्मचाऱ्यांनी माणूसकी म्हणून त्याला शांत करण्याचा आणि कपडे घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यामुळे तो अधिक घाबरला आणि अचानक पायऱ्यांकडे धावत खाली उतरून रस्त्यावर पळून गेला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तेथे उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी मोबाईलमध्ये शूट केला. नंतर हा व्हिडिओ चुकीच्या दाव्यांसह सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामुळे विविध अफवा पसरू लागल्या, असे पोलिस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिहारमध्ये मोठी दुर्घटना! गंगा नदीत २० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

महायुतीत समन्वयाचा 'दुष्काळ', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नाराज?

Fact Check: ऑनलाईन शॉपिंग महागणार? ऑनलाईन शॉपिंगवर 5% GST?

नवी मुंबई महापालिकेत मतदार राहतात, वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर 27 मतदारांची नोंद

IMD Alert: महाराष्ट्रासह 17 राज्यात धो-धो बरसणार वरूणराजा; 60 ताशी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

SCROLL FOR NEXT