delivery boy using horse saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: काकांनी तर कमालच केली, ऑनलाईन डिलीव्हरी थेट घोड्यावरून; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल चकीत

unique delivery boy using horse instead of bike Rajasthan: राजस्थानमध्ये एका व्यक्तीने घोड्यावर बसून ऑनलाइन ऑर्डर डिलिव्हरी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स आश्चर्यचकित झाले आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

ऑनलाइन ऑर्डर आणि 10 मिनिटांच्या डिलिव्हरीच्या जगात डिलिव्हरी बॉय साधारणपणे बाइक किंवा स्कूटरवर येतात. मात्र राजस्थानातील एका अनोख्या व्हिडिओची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगलीये. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती घोड्यावर स्वार होऊन ऑनलाईन ऑर्डर डिलिव्हरी करताना दिसतोय. आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक वाहतुकीचा हा संगम पाहून नेटिझन्स आश्चर्यचकित झालेत.

हा 11 सेकंदांचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Kapil_Jyani_ या हँडलवरून शेअर करण्यात आलाय. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती घोड्यावर बसून रस्त्यावरून जाताना दिसतेय. तिच्या पाठीवर ऑनलाईन डिलीव्हरी करणारी बॅग लटकलेली आहे. घोडा शांतपणे चालत असताना ती व्यक्ती लगाम पकडून पुढे जाताना दिसते. हा क्षण रस्त्याने जात असलेल्या एका गाडी चालकाने मोबाईलमध्ये कैद केला. अवघ्या काही वेळातच व्हिडिओ व्हायरल झालाय.

सोशल मीडियावरील युजर्सच्या विविध प्रतिक्रिया

व्हिडिओ शेअर करताना 'हे राजस्थान आहे, इथे सर्व काही शक्य आहे” असं कॅप्शन देण्यात आलंय. आतापर्यंत या व्हिडिओला हजारांहून अधिक व्ह्यूज मिळालेत. तर अनेकांनी यावर कमेंट्सही केल्या आहेत.

एका युजरने 'यातून घोड्याचा खर्च निघेल का?' असा सवाल केला. तर दुसऱ्या एका युजरने, काकांनी तर कमालच केली, अशी प्रतिक्रिया दिली. आणखी एका कमेंटमध्ये 'राजस्थानात परंपरा आणि आधुनिक जग एकत्र पाहायला मिळतंय, असं म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kairi Panha Recipe : रणरणत्या उन्हात कैरीचे पन्हे पिण्यासारखे दुसरी सुख नाही, गावाकडे 'अशी' बनवतात रेसिपी

Famous Actress Death : तेजस्वी तारा हरपला; ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, मनोरंजन विश्वावर शोककळा

Mumbai : मुंबईत हादरवणारी घटना, नवऱ्याने बायकोला धावत्या लोकलसमोर ढकलले, मृत्यूआधी...

Rain Alert : ऐन सणासुदीच्या तोंडावर धो धो पाऊस कोसळणार; ११ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा

Ladki Bahin Yojana: ९० लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद; मिळणार नाही ₹१५००; तुमचं नाव आहे का?

SCROLL FOR NEXT