CCTV Footage Saam TV
व्हायरल न्यूज

CCTV Footage : आधी हवेत उडाला मग धाडकन जमिनीवर आपटला; टायरमध्ये हवा भरताना तरुणाचा मृत्यू

Rajasthan Accident News : हवेच्या दाबाने टायर इतका जोरात फाटला की, वाहन चालक यामध्ये हवेत दूरवर फेकला गेला आणि समोर उभ्या असलेल्या बसला धडकून खाली आदळला.

Ruchika Jadhav

Accident News :

मृत्यू कधी आणि कसा ओढावेल काहीच सांगता येत नाही. राजस्थानच्या अजमेरमध्ये एक विचित्र अपघाताची घटना समोर आली आहे. आजवर तुम्ही दोन वाहने एकमेकांना धडकल्याचे अपघात पाहिले असतील. किंवा वाहनासमोर एखादी व्यक्ती अथवा वस्तू आल्याने अपघात झाल्याचे पाहिले असेल. मात्र टायरमध्ये हवा भरताना अपघात झाल्याचं कधी ऐकलं आहे का?

राजस्थानच्या अजमेरमध्ये एका बस चालकाचा टायरमध्ये हवा भरताना मृत्यू झाला आहे. हवा भरत असताना त्यात जास्त प्रमाणात हवा भरली गेली आणि टायर फाटला गेला. हवेच्या दाबाने टायर इतका जोरात फाटला की, वाहन चालक यामध्ये हवेत दूरवर फेकला गेला आणि समोर उभ्या असलेल्या बसला धडकून खाली आदळला.

या घटनेमध्ये वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर घटनेचा थरार रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाला आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार किशनगडजवळील रुपनगड परिसरात परबतसर मार्गावरील गुजराती हॉटेलजवळ हा अपघात झालाय.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह ताब्यात घेतला. घटनेचा सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर समजते की, यामध्ये कुणाचीही चूक नव्हती. टायर टाइट व्हावा यासाठी सदर व्यक्ती त्यात हवा भरत होता. मात्र हवा जास्त भरली गेली आणि टायर कमी पडला. त्यात हवेचा दाब जास्त असल्याने हा व्यक्ती हवेत वर फेकला गेला आणि त्याचा मृत्यू झाला.

सोशल मीडियावर @Avdheshpareek या ट्वीटर अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. सध्या हा अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. नेटकऱ्यांनी यावर दु:खद भावना व्यक्त केल्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जमीन संपादन केल्याशिवाय पंढरपूर-महाड रस्ता रुंदीकरण नको

TET : राज्यातील लाखो शिक्षकांचा पगार अडकणार, वेतन अधीक्षकांचे शाळांना महत्वाचे आदेश; ‘टीईटी’ संदर्भातील नवीन अपडेट काय?

Namo Shetkari Yojana: ‘नमो शेतकरी योजने’चा सातवा हप्ता; राज्यातील ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात

Malegaon Blast Case: NIA कोर्टचा आदेशाविरोधात उच्च न्यायालयात याचिका, साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहितांची अडचण वाढणार?

एका दिवसात किती सब्जा खावा? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT