Pune Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Pune Viral Video : पुण्यात तरुणीची जीवघेणी स्टंटबाजी; हातसोडून चालवली धावती दुचाकी, VIDEO व्हायरल

Pune Girl Stunt On Bike Video Viral : दुचाकी रस्त्यावर धावत असताना तरुणी दुचाकीवर वनसाईड बसलेली दिसतेय. इतकंच नाही तर तिने दुचाकीचे हँडल देखील पकडलेलं नाही.

Ruchika Jadhav

सोशल मीडियावर स्टंट करतानाचे आजवर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. खतरनाक स्टंटच्या व्हिडिओमध्ये शक्यतो तरुण मुलंचं दिसतात. मात्र आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका तरुणीने धावत्या दुचाकीवर जीवघेणी स्टंटबाजी केली आहे. हा व्हिडिओपाहून तुमच्याही काळजात धडकी भरेल.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी स्मशानभूमीबाहेरील रस्त्याजवळ आहे. येथे तिने दुचाकी सुरू केलीये. आता दुचाकी रस्त्यावर धावत असताना तरुणी दुचाकीवर वनसाईड बसलेली दिसतेय. इतकंच नाही तर तिने दुचाकीचे हँडल देखील पकडलेलं नाही. तरुणीने असा जीवघेणा स्टंट करताना त्याचा रिल व्हिडिओ बनवला आहे.

तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर व्हिडिओ पोस्ट केलाय. एका जुन्या रोमँटीक गाण्यावर तरुणीने रिल व्हिडिओ बनवला आहे. इतकंच नाही तर या तरुणीने दुचाकीवर डान्स स्टेप्स देखील केल्या आहेत.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार पुण्यातील हडपसर परिसरात ही घटना घडली आहे. तरुणीच्या या स्टंटमुळे तिचा मोठा अपघात होण्याची शक्यता होती. इतकंच नाही तर असे केल्याने तरुणीसह अन्य व्यक्तींचा जीव देखील धोक्यात आला असता. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यावर नेटकऱ्यांनी देखील विविध कमेंट केल्यात.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका व्यक्तीचा असाच व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीने देखील धावती दुचाकी हात सोडून चालवली होती. त्यावेळी या दुचाकीच्या आजुबाजूला देखील काही वाहने धावत होती. अपघाताच्या भीतीने अनेक वाहने या दुचाकीपासून दूर झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bandra-Worli sea link : २५० च्या स्पीडने पळवली लँबर्गिनी, मुंबईतील सी लिंकवरील व्हिडिओ

Maharashtra Live News Update: सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोचा भीषण अपघात

Breaking : धक्कादायक! मुंबई, नागपूरसह ४ कोर्टाला बॉम्बने उडवण्याची धमकी, राज्यात खळबळ

Five Hundred Rupees Note: ५०० रुपयांच्या नोटेवर किती भाषा असतात?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो eKYC झाली का? फक्त १२ दिवसांचा वेळ, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

SCROLL FOR NEXT