व्हायरल न्यूज

Viral monkey Punch: आईनंच चिमुकल्याला दूर केलं; माकडानं शोधली बाहुल्यात मायेची उब

Viral monkey Punch: आईच्या मायेची ऊब जगातल्या प्रत्येक जीवाला हवीहवीशी वाटणारी. मात्र जर जन्मानंतरच आईनंच चिमुकल्याला दूर केलं तर?. लहान बाळ आक्रोश करील. मात्र जन्मानंतर एक माकडाच्या पिलानं चक्कं बाहुलीत आईच्या मायेची ऊब शोधलीय.

Bharat Mohalkar

हा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून तुमच्या डोळ्यात पाणी येईल. कारण जुलै 2025 मध्ये जन्मलेल्या सात महिन्यांच्या माकडाच्या पिलाला आईनं प्रसूतीच्या वेदना आणि उष्णतेच्या लाटेमुळं सोडून दिलं. ही घटना मनाला चटका लावणारीच आहे. मात्र आईविना हे पिल्लू हवालदिल झालं..सैरभैर झालं. पिल्लाचा एकटेपणा कमी करण्यासाठी आणि त्याला तणावातून बाहेर काढण्यासाठी प्राणीसंग्रहालयाने नामी युक्ती शोधली. झू च्या कर्मचाऱ्यांनी चक्कं एक बाहुली या माकडाला दिली. आणि ही युक्ती कामी आली. कारण पिल्लाचा या बाहुलीवर जीव जडला.

पांची कुननेने बाहुलीलाच आई समजलं. हे पिलू त्याच्या कुशीत आईच्या मायेची ऊब घेतोय. बाहुलीला दिवसभर पाठीवर घेऊन फिरतंय. त्या बाहुलीला जवळ घेऊन झोपताना दिसतंय.. खरंच ही छोटीशी बाहुली पिलासाठी भावनिक आधार बनलीय.

जपानच्या इचिकावा सिटीतील प्राणीसंग्राहलयातील हृदयस्पर्शी कहाणी जगभरातील लोकांच्या हृदयाला भिडलीय. तर या छोट्याशा पिलाला पाहण्यासाठी झू मध्ये पर्यटकांची गर्दी वाढलीय. माणूस असो किंवा प्राणी आईशिवाय त्याचं जीवन अधूरच आहे. आईची माया कोणी देऊ शकत नाही. तिच्या प्रेमाची उब ज्याला मिळते. तो भाग्यवानच. हे माकडाचं पिल्लू जेव्हा मोठं होईल तेव्हा या बाहल्याबरोबर त्याचं नातं कसं असेल याची उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raghav and Shehnaaz: राघव जुयाल-शहनाज गिल रिलेशनशिपमध्ये? बर्थडे पार्टीनंतरची 'ती' मूव्हमेंट कॅमेऱ्यात कैद

Vande Bharat Sleeper: मुंबई-बंगळुरू प्रवास आता आणखी सुसाट! देशातील दुसरी 'वंदे भारत स्लीपर' तयार; किती डबे अन् मार्ग कोणता?

मिमिक्री अर्टिस्ट बोलायला लागले; मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्षपणे टोला

Health Care : महिनाभर केळी खाल्ली तर शरीवर काय परिणाम होतो?

Maharashtra News Live Update: अनेक लोकांना माझ्या भाषणाने मिरची लागली - देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT