Iran Viral Video saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: इराणमध्ये हिजाबविरोधात आंदोलन, कपडे उतरवत निषेध; तरूणीच्या व्हिडीओने खळबळ

Viral Video: इरान एक मुस्लिम देश असून या देशात राहणाऱ्या महिलांना अनेक नियमांचं पालन करावं लागतं. या ठिकाणी एका मुलीने तिचे कपडे काढले असून आणि फक्त आंतरवस्त्रांवर बाहेर फिरतेय.

Surabhi Jayashree Jagdish

इरान एक मुस्लिम देश असून या देशात राहणाऱ्या महिलांना अनेक नियमांचं पालन करावं लागतं. या देशामध्ये पर्दा किंवा हिजाब परिधान करणं गरजेचं असतं. याठिकाणी राहणाऱ्या महिलांनी सरकारच्या सूचनेनुसार, कपडे घातले नाहीत तर तिला शिक्षा देण्यात येते.

असं असून देखील इराणमधील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये दिसतंय की, एका मुलीने तिचे कपडे काढले असून आणि फक्त आंतरवस्त्रांवर बाहेर फिरतेय.

कपड्यांविना रस्त्यांवर फिरत होती महिला

ही घटना 'इस्लामिक आझाद युनिव्हर्सिटी'मधील आहे. या ठिकाणी शनिवारी ही मुलगी कपड्यांशिवाय रस्त्यावर फिरताना दिसली. समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, ही मुलगी इराणमधील ड्रेस कोडच्या विरोधात आहे. त्यामुळे त्याचा निषेध नोंदवण्यासाठी तिने हे कृत्य केल्याचं समजतंय.

मुलीला करण्यात आली अटक

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये इस्लामिक आझाद विद्यापीठाच्या सुरक्षा गार्डने महिलेला ताब्यात घेत असल्याचं दिसून येतंय. युनिव्हर्सिटीचे प्रवक्ते आमिर महजोब यांनी ट्विटरवरून माहिती दिली की, "पोलिस स्टेशनमध्ये ही मुलगी गंभीर मानसिक दबावाखाली असल्याचं आढळून आले. तिला मानसिक आजाराने देखील ग्रस्त आहे."

मानसिक आरोग्याने ग्रस्त

सोशल मीडिया युजर्सचा असा दावा आहे की, महिलेने तिचा निषेध नोंदवण्यासाठी हे कृत्य जाणूनबुजून केलं आहे. या तरुणीला अटक केल्यानंतर सुरक्षा गार्डने तिला कुठे नेलं याबाबत माहिती मिळालेली नाही.

सप्टेंबर 2022 मध्ये, महसा अमिनी नावाच्या महिलेला इराणमध्ये ताब्यात घेण्यात आलं होतं. तिला ताब्यात घेण्याचं कारण म्हणजे तिने कारण तिने हिजाब योग्य पद्धतीने परिधान केला नव्हता. यानंचर महसाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. लोकांनी आरोप केला की, पोलिसांनी महसाला छळलं, त्यामुळे तिचा मृत्यू झाला.

दुसरीकडे पोलिसांच्या म्हणण्यानुसार, महाशाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. यानंतर संपूर्ण इराणमध्ये या ड्रेसविरोधात प्रोटेस्ट करण्यात आलं. या निदर्शनांमध्ये सुमारे 500 लोकांचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dayaben Look: बाबो! किती बदलली 'तारक मेहता...' मधली दयाबेन; नवा लूक पाहून चाहते थक्क!

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंनी साद घातल्यावर अख्या महाराष्ट्राने प्रतिसाद दिलाय - अनिल परब

Marathi Bhasha Vijay Live Updates: वरळी डोममध्ये मराठी अस्मितेचा जल्लोष! ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला 'अमेरिकन पाहुणा' ठरतोय खास|VIDEO

दररोजचा संघर्ष! वाहत्या नदीतून शाळेत जातात हे विद्यार्थी! VIDEO पाहून अंगावर शहारे

Akola Horror : अकोल्यात धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, चालकाकडून भंयकर कृत्य, वाचून संताप येईल

SCROLL FOR NEXT