Mumbai Marine Drive Viral Video:  Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Video: अरेरे! शायनिंग चांगलीच नडली; प्रपोज करायला गेला अन् निबार मार खाल्ला.. VIDEO व्हायरल

Mumbai Marine Drive Viral Video: एका व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. ज्यामध्ये मरिन ड्राईव्हवर भलती हिरोगिरी करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडल्याचे दिसत आहे.

Gangappa Pujari

Mumbai Viral Video:

सध्या तरुणाईला रिल्स काढण्याचे, व्हिडिओ बनवण्याचे प्रचंड वेड लागलयं. सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी, फेमस होण्यासाठी तरुण- तरुणी अनेक स्टंट करत असतात. अनेक तरुण प्रँक करण्यासाठी नको त्या कला वापरतात अन् गोत्यात येतात. सध्या अशाच एका व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. ज्यामध्ये मरिन ड्राईव्हवर भलती हिरोगिरी करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडल्याचे दिसत आहे.

सोशल मीडियावर (Social Media) अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी डान्सचे, अपघाताचे, तर कधी लग्नातील खास व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असतात. सध्या अशाच एका प्रपोजच्या व्हिडिओने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. या व्हायरल व्हिडिओमधील तरुणाला शायनिंग मारत प्रपोज करणे चांगलेच महागात पडल्याचे दिसत आहे.

मुंबईच्या मरिन ड्राईव्हवरील हा व्हिडिओ असून मुलीला प्रपोज करायला गेल्यानंतर दोन तरुणींनी या तरुणाला चांगलाच धु धु धुतला. मुलींचा हा रुद्रावतार पाहून स्टाईलमध्ये प्रेम व्यक्त करण्यासाठी गेलेल्या तरुणाची चांगलीच फजिती झाली. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण मित्रांचे ऐकून समोरुन येणाऱ्या दोन तरुणींपैकी एकीला प्रपोज करायला जातो. हातात गुलाबाचे फूल घेऊन अगदी चित्रपटातील हिरोसारखा तो मुलीकडे पाहून गुलाब देतो. मात्र पुढे जे घडतं त्याचा तरुणाने विचारही केला नसेल. तरुणाने फूल समोर धरताच तरुणी चांगलीच संतापते अन् थेट त्याच्या श्रीमुखात भडकावते.

धक्कादायक म्हणजे ती तरुणी पायातली चप्पल काढून तरुणाला मारायचा प्रयत्न करते. हा प्रकार पाहून घाबरलेला तरुण थेट पळ काढतो. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तरुणाला अशी शायनिंग न मारण्याचा सल्ला दिला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Shetty House Firing Case: रोहित शेट्टी घरावर गोळीबार प्रकरणात पुणे कनेक्शन उघड, कर्वेनगरमधून चौघांना अटक

Union Budget 2026: कपडे, शूजपासून औषधांपर्यंत, अर्थसंकल्पात काय स्वस्त, काय महाग? वाचा संपूर्ण यादी

Kidney Failure: वारंवार थकवा जाणवतो? किडनी निकामी होण्याचे असू शकते लक्षण, वेळीच व्हा सावध अन् वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Accident News : बुलढाण्यात अपघाताचा थरार! महिला मजुरांच्या ऑटोला भरधाव कारची जोरदार धडक; ८ जण गंभीर, एका महिलेचा मृत्यू

Rohit Shetty: घराबाहेर गोळीबार झाला तेव्हा रोहित शेट्टी कुठे होता? हल्लेखोराबद्दल समोर आली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT