Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : पोलीस ठाण्याबाहेरच महिला पोलिसांचा भन्नाट डान्स; VIDEO तुफान व्हायरल, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

Viral Video : गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर स्वातंत्र्यदिना संबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत,त्यात पोलिसांच्या डान्सचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पोलीस हा आपल्या समाजातील असलेला अत्यंत महत्वपूर्व घटक आहे. दिवसरात्र पोलीस सामान्य व्यक्तींसाठी काम करत असतो. स्वता:च्या आयुष्यातील प्रत्येक सणवार सोडून फक्त समाजात शांतता आणि सुव्यवस्था राहावी यासाठी प्रयत्न करत असतात. अशाच पोलिसांचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्यात यात दोन महिला पोलीस काँस्टेबल आणि एक पोलीस कर्मचारी डान्स करताना दिसत आहेत.सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओ नागपुर (nagpur)शहरातील तहसील पोलीस स्टेशनच्या परिसरातील असून १५ ऑगस्टच्या दिवशीचा व्हिडिओ असल्याचा दिसत आहे. या पोलीस स्टेशनचा परिसर प्रचंड मोठा असून या परिसरात १५ ऑगस्टाच्या निमित्ताने फुग्यांची सजावट केलेली दिसून येत आहे. या व्हिडिओ सुरुवातीस अनेक पोलीस कर्मचारी दिसून येत आहेत शिवाय आपल्याला व्हिडिओत गाणी सुरु असलेली ऐकायला येत आहेत काही वेळातच दोन महिला पोलीस डान्स करण्यास सुरुवात करतात.

एरवी कायदा सुव्यवस्था सांभाळताना ताण तणाव,(stress) आणि गुन्हेगाऱ्यांच्या अवती भवती असणारे पोलिसांच्या चेहऱ्यावर आनंद डान्स मधून दिसून येत आहे.व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील @saamtv या अकाउटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पाहताच प्रत्येकाला व्हिडिओ पंसतीस पडलेला आहे.

प्रतिक्रिया...

व्हिडिओ(Video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ पोस्ट होताच अवघ्या काही वेळातच व्हिडिओला १ हजारांच्या पुढे लाईक्स मिळाले आहेत आणि मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळत आहेत. व्हिडिओ अनेक प्रतिक्रियाही मिळत आहेत.त्यातील एका यूजरने कमेंटबॉक्समध्ये लिहिले आहे की,''महाराष्ट्र पोलीस खरच खुप छान आहेत''अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Aus: भारताने पुन्हा टॉस गमावला; ऑस्ट्रेलियाच्या संघात ४ मोठे बदल, पाहा प्लेईंग ११

Maharashtra Live News Update: भाजपचे आमदार संजय केनेकर यांची उद्धव ठाकरेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

Raj Thackeray : पुण्यामध्ये राज ठाकरे संतापले; पदाधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाले '...तर पदं सोडा'

Kitchen Organize : स्वयंपाकघर व्यवस्थित ठेवण्याचे ५ सर्वोत्तम मार्ग, जाणून घ्या

Aadhaar-Pan Linking: हे काम आताच करा, अन्यथा ३१ डिसेंबरला येणार नाही पगार

SCROLL FOR NEXT