Poet Died of Heart Attack Video Saamtv
व्हायरल न्यूज

Heart Attack Video: कविता वाचता वाचता मंचावर कोसळले; हार्ट अटॅकने कवीचा जागीच मृत्यू; थरारक VIDEO

Poet Died of Heart Attack Video: कविता वाचण्यासाठी सुभाष चतुर्वेदी उभे राहिले. त्यांनी काही ओळी वाचल्या अन् अचानक ते मंचावर कोसळले. या प्रकाराने मंचावर एकच गोंधळ उडाला. हा थरकाप उडवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Gangappa Pujari

Heart Attack On Stage Viral Video:

हृदयविकाराच्या धक्क्याने  मृत्यू झाल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. लहानांपासून, मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा हार्ट अटॅकचा धोका जाणवत असून चालता- बोलता, जेवण करता करता मृत्यूने गाठल्याच्या घटना घडत आहेत. उत्तराखंडमधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्याचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ही दुर्दैवी घटना उत्तराखंड (Uttarakhand) उधमसिंहनगर भागातील आहे. उधमसिंह नगर येथील पंतनगर कृषी विद्यापीठाच्या डॉ.बीबी सिंग सभागृहात काव्य महोत्सव सुरू होता. शूर भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय स्वसंरक्षण मोहिमेने हे आयोजन केले होते. त्यात अनेक कवी सहभागी झाले होते. या काव्य मैफिलीत पंतनगरचे रहिवासी सुभाष चतुर्वेदी कविता वाचत होते.

कविता वाचण्यासाठी सुभाष चतुर्वेदी उभे राहिले. त्यांनी काही ओळी वाचल्या अन् अचानक ते मंचावर कोसळले. या प्रकाराने मंचावर एकच गोंधळ उडाला. योजकांनी त्यांना तातडीने विद्यापीठ रुग्णालयात नेले, तेथून त्यांना जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेने सुभाष चतुर्वेदी यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेनंतर त्यांना अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या मुळ गावी उत्तरप्रदेशात नेण्यात आले आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, सुभाष चतुर्वेदी यांची पंतनगर विद्यापीठात 1974 साली सहाय्यक लेखापाल म्हणून नियुक्ती झाली होती. 2014 मध्ये त्यांनी विद्यापीठातून निवृत्त होऊन जवाहरनगरमध्ये घर बांधून ते तिथेच स्थाईक झाले होते. या दुर्दैवी घटनेचा व्हिडिओ माध्यमांवर व्हायरल होत आहे. ज्यावर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिली आहेत. अनेकांनी ही घटना मन हेलावून टाकणारी असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Local Body Election : नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मोठी घोषणा; या शहरातील कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी

Wedding Saree Collection: सासरी उठून दिसाल! नव्या नवरीने या 5 प्रकारच्या साड्या नक्की खरेदी करा

Maharashtra Live News Update: महायुती कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रच लढणार

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

SCROLL FOR NEXT