Pitbull And Ieopard Fight instagram
व्हायरल न्यूज

Pitbull And Ieopard Fight: पिटबूल आणि बिबट्यामध्ये थरारक झुंज; दोघे एकमेकांवर पडले भारी, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहिलात का?

viral video: जयपूर, (Pitbull and leopard fight viral video) पिटबूल हा जगातील सर्वात धोकादायक कुत्र्यांच्या प्रजातीतील सर्वात धोकादायक कुत्रा आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जयपूर, (Pitbull and leopard fight viral video) पिटबूल हा जगातील सर्वात धोकादायक कुत्र्यांच्या प्रजातीतील सर्वात धोकादायक कुत्रा आहे.  पिटबुलला भारतात बंदी असतानाही काही लोक आजही आपल्या घरात पाळीव प्राणी म्हणून ठेवतात. पिटबूलने केलेल्या हल्ल्यात अनेकांनी आपला जीवही गमावला आहे. नुकताच एक घटना समोर आली ज्यात एक बिबट्या लोकवस्तीच्या परिसरात भक्ष्याच्या शोधात त्याला भेटतो. त्यानंतर बराच वेळ दोघांमध्ये जोरदार भांडण होते. या दोघांच्या भांडणात कोण पळ काढतो ते पाहून तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल. 

राजस्थानमधील जयपूरमध्ये घडलेल्या या घटनेत पिटबुल बिबट्यासमोर अजिबात टिकला नाही. साधारणपणे असे मानले जाते की सिंह, चित्ता किंवा बिबट्या स्वतःहून लहान किंवा समान आकाराच्या कोणत्याही प्राण्याची सहज शिकार करू शकतो. पण या व्हायरल व्हिडिओमुळे ही धारणा चुकीची असल्याचे दिसून येत आहे.

बिबट्याची पिटबुलशी झुंज

सीसीटीव्ही फुटेजनुसार ही घटना 15 नोव्हेंबर रोजी पहाटे 4.15 च्या सुमारास घडली. जेव्हा बिबट्या भक्ष्याच्या शोधात इकडे तिकडे फिरतो आणि लोकवस्तीच्या भागात पोहोचतो. पण तिथे एखादा पिटबुल आपली वाट पाहत असेल याची त्याला कल्पना नसते. बिबट्या पिटबुलला पाहताच त्याला भक्ष्य समजून त्याच्यावर झडप घालतो. पण पुढच्या काही सेकंदात बिबट्याला कळते की तो ज्याच्यावर भिडला तो साधारण प्राणी नाही.

यादरम्यान बिबट्या आणि पिटबुलमध्ये जोरदार लढत होते. ज्यामध्ये पिटबुल जखमी झाला तरी तो बिबट्याला पुढे जाऊ देत नाही. शेवटी संघर्षाचा परिणाम असा होतो की बिबट्या तथून धूम ठोकण्यातच भलाई मानतो. या झुंजीत पिटबुललाही दुखापत झाली, मात्र बिबट्याला पिटाळून लावण्यात त्याला यश आले.

@BhawaniSinghpr नावाच्या युजरने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. पिटबूलने बिबट्याला धोबीपछाड दिला असं कॅप्शन त्याला दिलं आहे.

याआधीही बिबट्याची लॅब्राडोरशी झाली होती झुंज

राजस्थानच्या उदयपूरमध्ये यापूर्वीही अशीच एक घटना समोर आली होती. ज्यामध्ये बिबट्या घरात उपस्थित असलेल्या लॅब्राडोरवर हल्ला करतो. मात्र, या झुंजीत बिबट्याने कुत्र्यावर जोरदार हल्ला केला. मात्र यादरम्यान कुत्र्याचा मालक घराबाहेर पडताच बिबट्या पळून जातो. त्यामुळे जखमी लॅब्राडोरचे प्राण वाचले.

राजस्थानमधील लोकवस्तीच्या भागात फिरणाऱ्या मानवभक्षी प्राण्यांचे व्हिडिओ दररोज व्हायरल होत आहेत. जे सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे. अशा परिस्थितीत शासनाने वनविभागाला या प्राण्यांना पकडण्याचे निर्देश द्यावेत अशा विनंती नागरिक करीत आहेत.

Edited By- नितीश गाडगे

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

India vs Pakistan Final: आशिया कप फायनलमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने

Asia Cup 2025 : अभिषेक-तिलकची दमदार खेळी, संजू सॅमसनही चमकला; श्रीलंकेसमोर 'इतक्या' धावांचे आव्हान

Triglycerides in children : पालकांची चिंता वाढली; ५ ते ९ वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय भयंकर आजार

Sunil Shelke: महाराष्ट्रातील आमदारांच्या हत्त्येचा कट?आमदाराला संपवण्याचा डाव कुणाचा?

SCROLL FOR NEXT