Funny Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Funny Viral Video: माणसाला जमले नाही ते चक्क डुक्कराने करून दाखवले..VIDEO बघताच नेटकरी झाले हैराण..

Funny Viral Video: माणूस म्हटलं की त्याच्यांतील विविध कला आपल्याला बघायला मिळतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Funny Viral Video

माणूस म्हटलं की त्याच्यांतील विविध कला आपल्याला बघायला मिळतात. काही व्यक्ती हे एखाद्या खेळामध्ये अव्वल असतात तर काही वेगवेगळ्या गोष्टींमध्ये बहादूर असतात. जसा मनुष्य हा परीपूर्ण काम करण्यात पटाईत आहे असे आपण समजतो. मात्र आता प्राणी ही माणसांप्रमाणेच खेळ खेळण्यास मागे राहिले नाहीत. आपण कधी कधी सोशल मीडियावर अनेक प्राण्यांच्या करामतीचे व्हिडिओ पाहत असतो. त्यात काही व्हिडिओ हे खोडकर माकडांचे असतात तर कधी गोडंस पण तितकाच्या भंयकर लहान पांडांचे व्हिडिओ असतात. पण सध्या सोशल मीडियावर एका डुंक्कराचा नाकाच्या साहाय्याने रिंग फिरवतानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत आपल्याला दिसते की, व्हिडिओतील व्यक्ती एक रिंग घेऊन ती कंबरेतून फिरवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र वारंवार प्रयत्न करुनही तो रिंग योग्यरित्या फिरवण्यात अयशस्वी ठरत आहे. या व्यक्तीच्यासमोर एक लहान डुक्कर आहे. डुक्कर या व्यक्तीला रिंग फिरवताना बघत असतो. मात्र व्यक्तीला रिंग फिरवण्यास नजमल्याचे बघून तो डुक्कर तिथून निघून जातो आणि एक लहान रिंग घेऊन येतो त्यानंतर तो आपल्या नाकाच्या साहाय्याने ती रिंग उत्तमरित्या फिरवतो. हा व्हिडिओतील डुक्कराला रिंग फिरवताना पाहून नेटकरी आश्चर्यचकीत झाले असतीलच.

@Yoda4ever या ट्वीटर अंकाऊटंवरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ हा त्याच्यांजवळील एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. व्हायरल व्हिडिओ नेमका कुठला आहे हे समजले नाही. अशा पध्दतीच्या प्राण्यांच्या करामतीचे व्हिडिओ बघून आपला थकवा गेल्याशिवाय राहणार नाही.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया आल्या आहेत. या व्हिडिओला हजारोंच्या घरात व्हूज मिळाले आहेत. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी गमतीदार कमेंट केल्या आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगात शेअर केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission : मुंबईतील बैठक संपली; बेसिक सॅलरीमध्ये DA मर्ज होणार का? वाचा अपडेट्स

Maharashtra News Live Update: राज ठाकरे यांची २७ तारखेला कर्जतमध्ये सभा

How to Peel Garlic: आता काही सेकंदात सोलून होईल लसूण; फक्त फॉलो करा या 3 टीप्स

Skin Cancer : नेलपेंट आणि मॅनिक्युरमुळे त्वचेचा कॅन्सर, तज्ज्ञांचा धक्कादायक खुलासा

Nanded : कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्याचं अपहरण अन् हत्या; साम टीव्हीच्या बातमीनंतर फायनान्स कंपनीला टाळं

SCROLL FOR NEXT