Pune: लढाई सुरु, उधारी बंद! पुणेरी पाटी चर्चेत...

Puneri Signboards: या पाटीमुळे पुणेकरांच्या सर्जनशीलतेचं आणि हटके पाट्यांचं पुन्हा एकदा दर्शन झालयं.
Puneri Pati - पुणेरी पाटी
Puneri Pati - पुणेरी पाटीगोपाळ मोटघरे
Published On

पुणे: पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. अशाच एका पुणेरी पाटीची (Puneri Signboards) चर्चा सध्या सगळीकडे जोरात सुरू आहे. पुणे (Pune) जिल्हातील पौड गावात न्यू भारत बेकरी चालकाने एक अनोखी पुणेरी पाटी लावली आहे. रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) या दोन देशांमध्ये सध्या सुरू असलेल्या युद्धामुळे ही पाटी लावण्यात आली आहे. (Funny Puneri Signboard going viral)

Puneri Pati - पुणेरी पाटी
Saturday Tips: शनिवारी फक्त 'हे' एक काम करा, सर्व संकटं दूर होतील!

"जगावर सध्या तिसऱ्या महायुद्धाचं सावट असल्याने उधारी बंद आहे." अशा आशयाची पुणेरी पाटी भारत बेकरीच्या मालकाने लावली आहे. जागतिक मंदीत उधार मागणाऱ्या ग्राहकांच्या जाचाला कंटाळून भारत बेकरीचे मालक विशाल राऊत यांनी ही पाटी लावली आहे. या पाटीमुळे पुणेकरांच्या सर्जनशीलतेचं आणि हटके पाट्यांचं पुन्हा एकदा दर्शन झालयं.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com