कोमल दामुद्रे
लग्न हा सगळ्यांच्याच आयुष्यातील एक महत्त्वाचा सोहळा असतो.
लग्नाच्या काही काळ आधी होणारा एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे साखरपुडा होय.
जोडपे एकमेकांच्या बोटात रिंग म्हणजे अंगठी घालतात
साखरपुड्याच्या प्रसंगी मुली डाव्या आणि मुलगा उजव्या अनामिकेत अंगठी घालतात, हे आपल्याला माहिती आहे.
ही अंगठी अनामिकेतच का घातली जाते? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.
अंगठी हा केवळ हाताच्या बोटांचे सौंदर्य वाढवणारा एक अलंकार नसून या मागे संरक्षणाची कल्पनाही आहे.
साखरपुड्यात नेहमी नवऱ्या मुलाच्या उजव्या हातात आणि नवरी मुलीच्या डाव्या हातात अंगठी घातली जाते. यालाच फिंगर रिंग असं म्हणतात.
डाव्या हातात अंगठी घालण्याचा ट्रेण्ड रोमन काळापासून फॉलो केला जात आहे.
डाव्या हाताचा थेट हृदयाशी संबंध असतो, असं रोमन लोकांचे मत होतं.
त्यामुळे डाव्या हातात अंगठी घातल्याने थेट हृदयाशी संबंध जुळतो. असा समज रोमन लोकांमध्ये होता.
यालाच 'vein of love' असं म्हणतात. या परंपरेमागे फॉरेवर लव अशी संकल्पना आहे.
कपल्समध्ये आयुष्यभर स्नेह आणि प्रेम राहण्याचं प्रतिक म्हणून डाव्या हातात अंगठी घालतात.
अनामिका हे पती-पत्नींमधल्या प्रेम, विश्वास, निष्ठेचं प्रतीक आहे.
एकमेकांच्या अनामिकेत साखरपुड्याला अंगठी घातल्यानंतर मुलामुलीमधलं नातं अधिक दृढ होतं असं मानलं जातं.
शास्त्रीयदृष्ट्या आपल्या भावनांचा संबंध मेंदूतील रसायनांशी असल्याचं म्हटलं गेलेलं असलं तरी पूर्वीच्या काळचे लोक मानवी भावनांचा संबंध हृदयाशी जोडायचे.
अनामिकेची नस ही आपल्या हृदयाशी थेट जोडलेली असते. त्यामुळे अनामिकेत अंगठी घातली की मुलामुलीची हृदयं एकमेकांशी जोडली जातात असं मानलं जातं.