व्हायरल न्यूज

Viral Video: चुक कोणाची? बाईकवाल्याची का कारवाल्याची; Video पाहून तुम्हीचं ठरवा

Shocking Video: सोशल मीडियावर एक धक्कदायक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. जिथे एका तरुणाला बाईक स्टंट करणे अंगलट आलेले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर कायम वाहन अपघातांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत अनेकदा थरारक अपघातांचे कारणही समजून जाते, ते अपघात अनेकदा वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे होतात तर अपघात तरुणांमध्ये असलेल्या बाईक स्टंटच्या वेडापायी होतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जिथे तरुणाईच्या बाईक्स स्टंटच्या नादात मोठा अपघात झालेला आहे.

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओ एका शहरातील रस्ता दिसून येत आहे. या रस्त्यावर अनेक वाहने जाताना दिसत आहे. मात्र एक व्यक्ती आहे जो बाईक चालवताना व्हिडिओ बनवत आहे. परंतू त्याच दरम्यान त्या रस्त्यावरुन एक तरुण अतिशय वेगात बाईक(Bike) चालवत असतो मात्र व्हिडिओ (Video)पाहिले तर दिसेल की अन्य वाहनांना कट मारून तो तरुण बाईक चालवत असतो मात्र काही अंतरावर जाताच एका चारचाकी वाहनाला जोरदार धडकतो आणि तो तरुण बाईकवरुन जमिनीवर पडतो. या अपघातात तरुणाला कोणतीही दुखापत झालेली दिसत नाही.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ कुठल्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मात्र तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील ''@gharkakalesh'' या अकाउंटवर व्हिडिओ शेअर करण्यात येत आहे. व्हिडिओ पोस्ट होताच मोठ्या प्रमाणात व्हिडिओला व्ह्यूज मिळाले आहे तर अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT