Jalgaon Video: Saam Tv
व्हायरल न्यूज

Jalgaon Video: जुन्या वादातून टोलनाक्यावर दोन गटात जोरदार हाणामारी, आठ जण गंभीर जखमी

Parola Taluka Fighting Video: सोशल मीडियावर सध्या एका भयंकर हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओत झालेल्या हाणामारीत अनेकजण गंभीर जखमी झाले असून, हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झालेले आहेत.

Tanvi Pol

Jalgaon News: जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात असलेल्या सब गव्हाण टोल नाक्यावर दोन गटांमध्ये भीषण हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडवून दिली आहे. या हाणामारीत दोन्ही गटातील एकूण आठ जण जखमी झाले असून त्यामध्ये पाच जण गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हाणामारीचा थरारक व्हिडिओ समोर

सर्व हाणामारीचा थरारक व्हिडिओ(Video) सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे. व्हायरल व्हिडिओत दोन्ही गटातील सदस्य एकमेकांवर दगडांनी आणि लाथा-बुक्क्यांनी हल्ला करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. काहीजण रस्त्यावर पडून असताना त्यांच्यावरही बेधडक मारहाण सुरू होती. या व्हिडिओमुळे घटनेचे गांभीर्य अधिकच स्पष्ट झाले आहे.

हाणामारीचे नेमके कारण तरी काय?

एक दिवसांपूर्वी टोलनाक्यावर वाद झाला होता त्याच वादातून ही हाणामारी झाल्याची माहिती मिळाली आहे. हाणामारीत दोन्ही गटातील एकूण आठ जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबत गुन्हा दाखल करून पोलिसांनी नशिराबाद टोळीतील दहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले

टोल नाक्यावरील हाणामारीचा(Fighting) व्हिडिओ सध्या प्रत्येक सोशल मीडिया माध्यमांवर व्हायरल होत आहे. त्यात तो व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील saamtvnews या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला असून नेटकऱ्यांनी त्यावर त्यांची मते ही दिलेली आहेत. काहींनी हे नेहमीच असं असतं असं म्हटलं आहे तर काहींनी म्हटलं की, अशा घटनांमध्ये वारंवार वाढ होत आहे'' अशा प्रकारे समिश्र प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये भरधाव कारची ४ दुचाकींना धडक, २ जण जखमी

Rice Risk: सतत भात गरम करून खाताय? वेळीच सवय मोडा, नाहीतर गंभीर आजाराला द्याल आमंत्रण

Ajit Pawar Death: पुरावे असताना कारवाई का नाही? मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात रोहित पवार आक्रमक

Vastu Tips For Holi: होळीच्या आधीच घरातून या 5 वस्तू बाहेर काढा, अन्यथा नंतर होईल मोठा त्रास

Viral Video: कॅबमधील इमर्जन्सी बटन खरंच काम करतंय का? ड्रायव्हरने दिलेल्या उत्तराने बसेल धक्का, VIDEO चर्चेत

SCROLL FOR NEXT