Viral Video: Saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: जन्मदात्या आईचा अमानुष छळ, डोकं आपटलं, केस ओढले अन् कानाखाली... संतापजनक VIDEO

Son Badly Beaten Mother Viral CCTV Footage: हा व्हिडिओ ईतका क्रूर आणि भयंकर आहे की पाहणाऱ्याच्याही अंगावर काटा उभा राहतो.

Gangappa Pujari

Panjab Viral Video:

देवाला सर्व ठिकाणी जाता येईना म्हणून त्याने आई निर्माण केली... हा शाळेतला सुविचार प्रत्येकाला आठवत असेल. आई अन् वडील हेच आयुष्यातील चालती बोलती दैवत आहेत, असे म्हणले जाते. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आयुष्यभर झटनारे आई बाप असतात.

पण अनेकांना आपल्या जन्मदात्या आईचीच किंमत नसते. म्हणूनच आईची हत्या केल्याच्या, घराबाहेर काढल्याच्या अनेक बातम्या ऐकायला मिळतात. असाच एक संपातजनक प्रकार गुजरातमधून समोर आला आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पंजाबच्या (Panjab) रुपनगर जिल्ह्यातील ही घटना. 75 वर्षीय आशा वर्मा त्यांचा मुलगा अंकुर वर्मा, सून आणि नातवासोबत झैल सिंग नगरमध्ये राहतात. वृद्धापकाळामुळे त्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. आशा वर्मा यांच्याशी त्यांचा मुलगा अंकुर क्रुरपणे वागतो, मारहाण करतो अशी तक्रार त्यांची मुलगी दीपशिखा यांनी केली होती.

मात्र याबद्दल त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नव्हते. त्यात त्यांचा भाऊ अंकुर स्वतः वकील होता. त्यामुळेच मुलगी दिपशिखा यांनी आईला भेटण्याच्या बहाण्याने भावाकडे गेल्यानंतर त्यांच्या खोलीत छुपा कॅमेरा लावला होता. या कॅमेऱ्यात जे कैद झालं ते फारच भयंकर आणि संतापजनक होतं ज्याचे सीसीटिव्ही फुटेज (CCTV Footage) सध्या व्हायरल होत आहेत.

या व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) मुलगा अंकुर आपल्या जन्मदात्या आईचा अमानुष छळ करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये वृद्ध महिला बेडवर झोपली असताना मुलगा अंकुर वर्मा येतो आणि आईला मारहाण करायला लागतो. तो कधी अक्षरश:आईचे केस ओढताना, तिच्या गालात सतत चापट मारताना आणि डोक आपटताना दिसत आहे. हा व्हिडिओ ईतका क्रूर आणि भयंकर आहे की पाहणाऱ्याच्याही अंगावर काटा उभा राहतो.

धक्कादायक बाब म्हणजे, अंकुर प्रमाणे त्याचा मुलगाही आपल्या आजीचा छळ करताना दुसऱ्या व्हिडिओत दिसत आहे. हा मुलगा स्वतः आजीच्या बेडवर पाणी ओततो आणि वडिलांकडे तिने लघवी केल्याची तक्रार करतो. यानंतर पुन्हा मुलगा आपल्या आईला बेदम मारहाण करतो.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पत्रकार गगनदीप सिंहने हे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या घटनेवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी अशा मुलांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर काही नेटकऱ्यांनी आईचा छळ करणाऱ्यांना देव कधीही माफ करणार नाही, त्यालाही कर्माचे फळ भोगावे लागेल, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

SCROLL FOR NEXT