Weeding Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: पंडीतजी रॉक अन् वऱ्हाडी शॉक; वधू वराचा हात हातात देऊन म्हटले किस करा...

Weeding Viral Video: लग्न(Wedding) प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो. लग्न म्हणजे दोन जिवांचा संगम.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Viral Panditji In Wedding

लग्न(Wedding) प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो. लग्न म्हणजे दोन जिवांचा संगम. लग्नात नवरा अन् नवरीकडे सर्वांचे लक्ष असते. लग्न सोहळ्यावेळी होणारे प्रत्येक विधी, गंमती- जमती पाहण्याची सर्वांना उत्सुकता असते. लग्न सोहळ्यातील अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र सध्या एका लग्नातल्या 'पंडीतजीची' सोशल मीडियावर तूफान चर्चा होत आहे. ज्यामध्ये पंडीतजीनी नववधूला चक्क फोटो काढण्यासाठी 'फोटो पोज'सांगितली आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, आपल्याला स्टेजवर लग्नाच्या सभांरभाची लगबग दिसते शिवाय स्टेजवर नवदेव आणि नववधूही आहेत. त्यात स्टेजवर पांढऱ्या कुर्ता परिधाण केलेले गुरुजीही आहेत.

लग्न लागल्यानतंर नवरदेव आणि नववधूमध्ये फोटो काढायचे सुरू असतात. त्यात सुरुवातीस नवरदेव नवरीचा हात पकडून एक पोज देतो त्यानतंर तिला ही सेम पोज देण्यासाठी सांगितले असता तिला ते जमत नसल्याचे दिसते. तेवढ्यात त्यांच्या पाठीमागे असलेल्या गुरुजींनी चक्क नवरीला फोटोसाठी पोज करुन दाखवली असता नवरदेव आणि नवरी हसतात.

मात्र लग्नातील व्हिडिओ कुठल्या शहरातील आहे समजू शकल नाही. मात्र याआधीही लग्नातील अनेक विचित्र व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. कधी नवरा- नवरीच्या जबरदस्त एन्ट्रीची, कधी डान्सची, तर कधी पाहुण्यांमध्ये जुंपलेल्या भांडणांची माध्यमांवर चर्चा पाहायला मिळते.

पंडीतजीच्या गमतीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील @gavraantadka या अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर होताच हजारोंच्या घरात लाईक्स मिळाले असून मोठ्या प्रमाणात व्हिडिओला व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओच्या कमेंट्समध्ये नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रीया लिहिल्यात. त्यातील एका यूजरने लिहिलं आहे की,'पंडितजी आधी फोटोग्राफर होते वाटत'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election 2024: १५८ पक्ष विधानसभेच्या रिंगणात, भाजप तिसऱ्या क्रमांकावर, सर्वाधिक जागा कोण लढवतंय?

Sugarcane Juice: उसाच्या रसाचे आरोग्यदायी फायदे!

Maharashtra News Live Updates: नाशिक जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार

Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

Railtel Recruitment: सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी;अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु; पात्रता काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT