PANDHARPUR WILL NOT BECOME MAHARASHTRA’S 37TH DISTRICT; VIRAL CLAIM FACT CHECKED saam tv
व्हायरल न्यूज

Fact Check: महाराष्ट्राला 37 वा जिल्हा मिळणार? नवीन जिल्हा निर्माण होणार?

Pandharpur to Become Maharashtra’s 37th District: आम्ही व्हायरल होत असलेल्या मेसेजची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो...आता महाराष्ट्राला 37 वा जिल्हा मिळणार असल्याचा दावा करण्यात आला...पंढरपूरला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला मान्यता दिल्याचा दावा केल्याने आता नवीन जिल्ह्याची घोषणा होणार अशी चर्चा आहे...पण, खरंच पंढरपूर नवीन जिल्हा निर्माण केला जाणार आहे का...? आम्ही याची पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं चला पाहुयात...

Sandeep Chavan

सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर या ठिकाणी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला मंजुरी मिळालीय...यामुळे पंढरपूर वेगळा जिल्हा होणार का याबाबत सध्या सोशल मीडियामध्ये चर्चा सुरू आहेत...या बातमीची पडताळणी करण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने थेट सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं...आणि अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडून याबाबत अधिक माहिती जाणून घेतली...

...हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आता महाराष्ट्राला 37 वा जिल्हा मिळणार असल्याची चर्चा सुरू झालीय...सोलापूर जिल्ह्यात तब्बल 11 तालुके आहेत...यामुळे तब्बल 100 ते 150 किलोमीटरचा प्रवास करून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय गाठावं लागतं...मात्र, आता अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला मान्यता दिल्याचा दावा केलाय...पण, खरंच अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला मान्यता दिल्याने नवीन जिल्हा निर्माण केला जाणार आहे का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...

पंढरपूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला मान्यता

प्रशासनावरील ताण कमी होईल

नागरिकांचा प्रवास वाचेल, काम लवकर मार्गी लागेल

पंढरपूर वेगळा जिल्हा निर्माण होणार नाही

सोलापूर जिल्ह्यात तब्बल 11 तालुके आहेत.यामध्ये काही नागरिकांना तब्बल शंभर किलोमीटरच्या प्रवास करून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय गाठायला लागते...मात्र, आता पंढरपूर या ठिकाणी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला मान्यता मिळाल्याने हा प्रवास कमी होणार आहे...पंढरपूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला 7 तालुके जोडले जाणार असून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 4 तालुक्यांचे काम पहिले जाणार आहे...यामुळे प्रशासनावरील ताण कमी होईल आणि नागरिकांची सोय होणार आहे...त्यामुळे आमच्या पडताळणीत पंढरपूर हा वेगळा जिल्हा होणार असल्याचा दावा असत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिक्षक मतदारसंघात महायुतीत फूट, महायुतीत पाचही जागांवर बंडखोर

Latest New Mangalsutra Designs For Women: नवीन मंगळसूत्र घ्यायचंय? सध्या ट्रेंडमध्ये आहेत 5 डिझाईन्स

एक इंचही मागे हटणार नाही; MPSC विद्यार्थी आंदोलनावरून राहुल गांधींचं फडणवीस सरकारला चॅलेंज, VIDEO

ड्रग्ज सेवनामुळे एकाचा मृत्यू, शौचालयात ड्रग्जची डर्टी पार्टी

Cashews Vs Almonds: काजू आणि बदाम, आरोग्यासाठी कोणतं ड्रायफ्रुट्स फायदेशीर?

SCROLL FOR NEXT