Low BP Symptoms: अचानक BP Low झाला तर काय करावं? त्वरीत कोणते उपाय करावेत?

Bharat Jadhav

हृदयाशी संबंधित आजार

रक्तदाबाची समस्या आज केवळ भारतातच नव्हे, तर जगातील जवळजवळ प्रत्येक देशात दिसून येते. ही समस्या किरकोळ वाटू शकते, परंतु ती नियंत्रणात न ठेवल्यास हृदयाशी संबंधित आजार उद्भवू शकतात.

Low BP Symptoms: Quick Steps to Take When Blood Pressure Falls

रक्तदाबाची समस्या म्हणजे काय

एनएचएलबीआयनुसार, रक्तदाब म्हणजे रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर रक्ताद्वारे पडणारा दाब. हा दाब विविध कारणांमुळे बदलू शकतो. सामान्य रक्तदाब १२०/८० मिमी एचजी (mm Hg) पेक्षा कमी असतो. कमी रक्तदाब, ज्याला 'हायपोटेन्शन' (hypotension) असेही म्हणतात. रक्तदाब जो सामान्य मर्यादेपेक्षा लक्षणीयरीत्या कमी असतो.

Low BP Symptoms: Quick Steps to Take When Blood Pressure Falls

सतत रक्तदाब कमी असण्याचा अर्थ काय?

NHLBI नुसार, काही लोकांचा रक्तदाब नेहमीच कमी असतो, जे त्यांच्यासाठी सामान्य असते. इतर काही प्रकरणांमध्ये रक्तदाब अचानक कमी होऊ शकतो. कमी रक्तदाब हा एखाद्या अंतर्निहित आरोग्य समस्येशी संबंधित असू शकतो. या सर्व परिस्थिती धोकादायक ठरू शकतात.

Low BP Symptoms: Quick Steps to Take When Blood Pressure Falls

स्ट्रोकचा धोका

आणि या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण याचा अर्थ असा असू शकतो की तुमच्या हृदयापर्यंत, मेंदूपर्यंत किंवा इतर महत्त्वाच्या अवयवांपर्यंत पुरेसा रक्तपुरवठा होत नाहीये. ज्यामुळे तुम्हाला हृदयविकाराचा झटका (हार्ट अटॅक) किंवा पक्षाघाताचा (स्ट्रोक) धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे वेळीच डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे आणि परिस्थिती नियंत्रणात आणणे हिताचे ठरेल.

Low BP Symptoms: Quick Steps to Take When Blood Pressure Falls

रक्तदाब नियंत्रित कशामुळे होतं?

अवयव, हार्मोन्स आणि नसा यांसारख्या शरीरातील विविध प्रणाली रक्तदाब नियंत्रित करतात.

Low BP Symptoms: Quick Steps to Take When Blood Pressure Falls

लो ब्लड प्रेशर का होतं?

दुखापतीमुळे रक्तस्राव झाला तर रक्तदाब अचानक कमी होतो. डिहायड्रेशन (शरीरातील पाण्याची कमतरता), मधुमेह, हृदयाशी संबंधित समस्या, जसे की अ‍ॅरिथमिया (हृदयाचे ठोके अनियमित असणे), उच्च रक्तदाब, नैराश्य किंवा पार्किन्सन आजारासाठी घेतली जाणारी औषधे, गर्भावस्था.

Low BP Symptoms: Quick Steps to Take When Blood Pressure Falls

तुमचा बीपी अचानक कमी झाला तर काय करावं?

रुग्णाला बसण्यास मदत करा, यामुळे त्यांना आराम मिळू शकतो. रक्तदाब सामान्य होण्यास मदत होऊ शकते. निर्जलीकरणामुळे (dehydration) रक्तदाब कमी होऊ शकतो, म्हणून त्यांना थोडे-थोडे पाणी वारंवार प्यायला द्या. जर डॉक्टरांनी रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आधीच काही औषधे दिली असतील, तर ती घेतल्याची खात्री करावी. रुग्णाला त्वरित डॉक्टरांकडे घेऊन जा.

Low BP Symptoms: Quick Steps to Take When Blood Pressure Falls

टीप

ही माहिती केवळ सामान्य उद्देशांसाठी दिली आहे. अधिक तपशीलांसाठी, कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्या किंवा डॉक्टरांशी संपर्क साधा.

Low BP Symptoms: Quick Steps to Take When Blood Pressure Falls

हेही वाचा

येथे क्लिक करा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

झोपेत लाळ का गळते? कोणत्या आजाराचे लक्षण आहे का?