Pakistan Mall Loot सोशल मीडिया
व्हायरल न्यूज

Pakistan Mall: यापेक्षा भिकारी बरे... पाकिस्तानमध्ये 'ओपनिंग डे'ला लुटला मॉल; व्हायरल व्हिडिओ

Pakistan Mall Looted on the day of Opening Video Goes Viral on Social Media: पाकिस्तानमध्ये कराचीमधील ड्रीम मॉलचे उद्घाटन झालं अन् अर्ध्या तासातच तो लुटला गेला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

Namdeo Kumbhar

Pakistan Mall Loot Viral Video: पाकिस्तानमधील कराची येथील ड्रीम बाजार नावाचा एका शॉपिंग मॉलचं उद्घाटन झालं. पण या ड्रीम बाजार मॉलला कराचीमधील लोकांनी अर्ध्या तासातच लुटले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ओपनिंग डे असल्यामुळे ड्रीम बाजारमध्ये मोठा डिस्काउंट ठेवण्यात आला होता. फ्री-फ्री-फ्री... पाहिलं अन् नागरिकांनी मॉलच लुटला. काट्यांनी तोडफोड केली गेली... मॉल सुरु झाल्यानंतर फक्त अर्ध्या तासातच लुटला गेलाय.

काराची येथील ड्रीम बाजार लूटीचा व्हिडीओ व्हायरल झालाय. त्या व्हिडीओत लोक मॉल लुटताना दिसत आहेत. मॉलच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेय. त्याशिवाय घटनास्थळावर पोलीस उपस्थित नसल्याचेही सांगण्यात आलेय.

नव्या मॉलचे ओपनिंग असल्यामुळे सोशल मिडियावर जोरदार प्रचार केला. उद्घाटनाच्या दिवशी कपडे, ॲक्सेसरीज आणि घरगुती वस्तूंवर मॉलमध्ये भरघोस सूट ठेवण्यात आली होती. मॉलबाहेर हजारो लोक जमले होते, वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मॉलमध्ये तोडफोड -

पाकिस्तानमधील स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, मॉलमधील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी दरवाजे बद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण लोक लाठ्या-काठ्या घेऊ आले होते. त्यांनी जबरदस्तीने प्रवश केला. काचा फोडल्या अन् मालाची लूट केली.

परिस्थिती इतकी भयंकर झाली की मॉलमधील गर्दीमुळे शहरातील वाहतूक ठप्प झाली. कारण, मॉलच्या बाहेरही हजारो लोक होते. लोकांच्या झटापटीमध्ये बाजार मॉलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय. घटनास्थळावर पोलिसही नसल्याचा आरोप कऱण्यात आला.

दुपारी ३ वाजता मॉलचे ओपनिंग करण्यात आले. नवीन मॉल सुरु केल्यामुळे अनेक ऑफर देण्यात आल्या होत्या. पण दुपारी साडेतीन वाजेपर्यंत पाकिस्तानमधील लोकांनी अख्का मॉल लुटला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajpal Yadav : तुरूंगाबाहेर येताच राजपाल यादवची नको ती मागणी, मुख्यमंत्र्यांना भेटून सगळे काही सांगणार

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

Bhiwandi : भिवंडीत गेम पलटणार? भाजपला मोठा धक्का; 10 नगरसेवक काँग्रेससोबत जाणार?

How To Make Face Toner At Home: चेहऱ्याला लावण्यासाठी घरीच फेस टोनर कसं बनवायचं?

Dhule : सातव्या बायकोने पोटच्या मुलांसह केली आत्महत्या, नवऱ्याच्या 'त्या' कृत्याने सर्वच हादरले

SCROLL FOR NEXT