owaisi Saam Tv
व्हायरल न्यूज

ओवेसींचा रामाला नमस्कार; व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

Viral Photo: एमआयएमचे खासदार ओवेसींनी श्री रामासमोर हात जोडल्याचा फोटो प्रचंड व्हायरल होतोय. या फोटोत ओवेसी रामाला नमस्कार करत असल्याचं दिसतंय.पण, खरंच ओवेसींनी रामासमोर हात जोडलेयत का...?

Tanvi Pol

एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा हा फोटो आहे रामासमोर. ओवेसींनी हात जोडतानाचा हा फोटो प्रचंड व्हायरल होतोय हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर कमेंटचा पाऊस पडलाय.काहींनी तर ओवेसींना शिवीगाळही केलीय.पण, खरंच ओवेसी आता राम भक्त झालेयत का...? ओवेसींचा हा फोटो कुणी काढलाय...? हा फोटो कधीचा आहे...? याची आम्ही पडताळणी सुरू केली.त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.

भगवान श्री रामाच्या मूर्तीसमोर एमआयएमचे खासदार ओवेसींनी हात जोडून नमस्कार केलाय.हा मेसेज आणि फोटो व्हायरल होत असल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली.याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी ओवेसींचं सोशल मीडिया (Media)अकाऊंट तपासून पाहिलं.तिथे आम्हाला कुठेही असा फोटो सापडला नाही.त्यामुळे आमच्या टीमने हा फोटो तपासून पाहिला त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

रामाच्या मूर्तीसमोर हात जोडल्याचा फोटो खोटा आहे. एआयच्या माध्यमातून ओवेसींचा फोटो बनवण्यात आला आहे. ओवेसींनी खरचं रामाला नमस्कार केलेला नाही. एआय निर्मित फोटो व्हायरल करून दिशाभूल करण्यात येत आहे.

एआयमुळे कोणाच्याही फोटोशी छेडछाड करणं शक्य आहे,अशा प्रकारचे व्हिडिओही बनवता येतात आणि त्यातून लोकांची दिशाभूल केली जातेय,त्यामुळे अशा फोटोवर विश्वास ठेवू नका.आमच्या पडताळणीत श्री रामाच्या मूर्तीसमोर ओवेसींनी हात जोडल्याचा दावा असत्य ठरलाय.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Konkan Ro Ro Seva : गणेशोत्सवासाठी खुशखबर मुंबई ते सिंधुदुर्ग सागरी रो-रो सेवा लवकरच सुरु | VIDEO

Maharashtra Live News Update: मालेगाव बॉम्ब स्फोटप्रकरणातील निकाल वाचनाला सुरुवात

Monsoon Eye Care : डोळ्यांची जळजळ अन् लाल झालेत का? पावसाळ्यात अशी घ्या काळजी

MPSC FDA Recruitment: अन्न व औषध प्रशासनात नोकरीची संधी; पगार १३२३०० रुपये; MPSC द्वारे जाहीर केली भरती

Khalapur Toll Plaza : बनावट व्हीआयपी पास विकून लाखोंची कमाई; खालापूर टोल नाक्यावरील सिक्युरिटी गार्डचा गोरखधंदा उघड

SCROLL FOR NEXT