CCTV Video Saam Tv
व्हायरल न्यूज

CCTV Footage: एकाच वेळी ४ भटके कुत्रे महिलेवर तुटून पडले; अंगाचा थरकाप उडवणारा भयंकर व्हिडिओ

CCTV Video: रस्त्यावर भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. भटक्या कुत्र्यांनी एका महिलेवर हल्ला केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Noida Viral News:

रस्त्यावर भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हे कुत्रे अनेकदा नागरिकांच्या पाठी लागतात तर अनेकदा त्यांना चावादेखील घेतात. नुकताच भटक्या कुत्र्यांनी आईच्या हातातील बाळाचा चावा घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा असाच एक प्रकार घडला आहे. (Latest News)

नोएडातील एका सोसायटीमध्ये एका महिलेवर तीन भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. व्हायरल व्हिडिओत एक महिला डोक्यावर एका सोसायटीत जाताना दिसत आहे. ही महिला सोसायटीच्या आत जाते. तिथे एक कुत्रा बसलेला दिसत आहे. थोड्या वेळानंतर तो तिच्यावर भूंकतो. तेव्हा ही महिला त्याला लांब पळवते.

मात्र, थोड पुढे गेल्यावर तिच्यावर अजून दोन कुत्र्यांनी हल्ला केला. अजून दोन कुत्रे त्या महिलेवर भूंकायला लागले. महिलेने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. कुत्रेही तिच्या मागे पळू लागले. त्यानंतर महिला सोसायटीबाहेरच पळून जाते. हा संपूर्ण प्रकार खूप जास्त धक्कादायक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडातील सेंच्युरियन पार्क लो राइज अपार्टमेंटमध्ये हा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pav Bhaji: घरच्या घरी स्ट्रीट स्टाईल पावभाजी कशी बनवायची?

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Madhuri Dixit: धकधक गर्लचं लाजवाब सौंदर्य, फोटो पाहताच घायाळ व्हाल

Sonu Nigam : 'ये दिल दीवाना...' रस्त्यावर थांबून छोट्या चाहत्यासोबत सोनू निगमनं गायलं गाणं, पाहा VIDEO

आता देशात एकसमान मानकांद्वारे घेण्यात येणार मातांची काळजी, NABH कडून नवीन आरोग्य मानकांचा समावेश

SCROLL FOR NEXT