Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : धावत्या कारच्या टपावर ढाराढूर झोपला; स्टंटमॅनला भलतंच महागात पडलं, डोकं गरगरेल असं घडलं!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Noida Viral Video : काही तरूणांना वेग आवडतो. अतिघाई...संकटात नेई हा जरी सावधानतेचा इशारा असला तरी, त्याकडे ते जाणूनबुजून दुर्लक्ष करतात. स्टंटबाज तर गल्लोगल्ली बघायला मिळतात. अगदी जीवावर उदार होऊन स्टंट करत असतात. बरं यांची इतकी हिंमत की, कारवाई करूनही यांना काहीच फरक पडत नाही. पण नोएडात अशाच एका स्टंटबाजावर डोक्याला हात लावायची वेळ आली आहे.

सोशल मीडियावर स्टंटचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. ते बघितले तरी काळजाचा ठोका चुकतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण खरी गंमत पुढे आहे. वाहतूक पोलिसांनी त्याची 'गहिरी' जिरवलीये.

नोएडातील रस्त्यावरचा हा व्हिडिओ आहे. अंगावर काटा आणणाराच म्हणावा लागेल. कारच्या टपावर एक तरूण झोपलेला दिसत आहे. बरं सपोर्ट काहीच नाही. पण गडी बिनधास्त झोपलाय. थोडी जरी चूक झाली तर आयुष्याचा दोर कापला जाऊ शकतो अशी अवस्था.

जीवावर उदार होत हा स्टंट केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नोएडा वाहतूक पोलिसांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी तात्काळ तपास सुरू केला. या कारचा नंबर दिल्लीचा आहे. त्यावरुन पोलिसांनी कारच्या मालकाचा शोध घेतला. कारमालकाच्या विरोधात वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे.

हा व्हिडिओ त्याच रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने काढला आहे. सफेद रंगाच्या कारच्या टपावर ही स्टंटबाजी केल्याचे व्हिडिओत दिसते. अशा प्रकारची स्टंटबाजी जीवघेणी ठरू शकते.

हा व्हिडिओ एका व्यक्तीने एक्स (ट्विटर) वर पोस्ट केला आहे. 'नोएडामध्ये मृत्यूला निमंत्रण' अशी कॅप्शन दिली आहे. 'नोएडा वाहतूक पोलीस' आणि उत्तर प्रदेश पोलिसांना यात टॅग केले आहे. वाहतूक पोलिसांनी या तरुणाविरोधात कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. कार जप्तच करा असंही काही यूजरने म्हटलं आहे.

हा व्हिडिओ नोएडा पोलिसांनी रिशेअर केला असून, एक पत्रक जोडलं आहे. या कारचा मालक मूळचा दिल्लीचा आहे. त्याच्याविरोधात मोटार वाहन कायद्यांतर्गत (MVA) गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर इतर नियमही मोडल्यानं दंडही आकारण्यात आला आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने त्याला तब्बल २६,००० रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये अधिकारी होण्याची संधी; या पदासाठी सुरु आहे भरती; वाचा संपूर्ण माहिती

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

SCROLL FOR NEXT