Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: धावत्या लोकलमधून उतरायला गेला अन् विपरित घडले, हृदयाचे ठोके वाढवणारा व्हिडिओ बघा!

CCTV Viral Video: सोशल मीडियावर रेल्वे संबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशातच नवी मुंबईतील एका रेल्वे स्थानकातील व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्यात धावत्या रेल्वेतून उतरण्याची घाई एका व्यक्तीच्या अगंलट आलेली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दरदिवशी लोकल ट्रेनमधून असंख्य प्रवाशी प्रवास करत असतात. लोकल ट्रेनचा प्रवास जेवढा जलद आहे. तेवढाच गेल्या काही वर्षापासून धोकादायक ठरत असल्याचे दिसत आहे. कामाच्या धावपळीत लोकल ट्रेनमधून उतरण्याच्या नादात तर कधी धावत्या लोकलमध्ये चढण्याचा अनेकजण प्रयत्न करत असतात. मात्र या घाईमुळे अनेकांना धावत्या ट्रेनमधून पडून जीव गमवावा लागला आहे. सध्या असाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जिथे धावत्या लोकलमधून उतरण्याचा पायी एका व्यक्तीला जीव गमवावा लागला असता. संपूर्ण घटनेचा थरार प्लॅटफॉर्मवरील सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत गोंवडी रेल्वे (Railway) स्टेशनवर दिसत आहे. रेल्वे स्टेशनवर अनेक प्रवाशाची गर्दी दिसून येत आहे. मात्र व्हिडिओत एक धावती लोकल ट्रेन रेल्वे स्टेशनवर येत आहे. मात्र संपूर्ण ट्रेन थांबण्याआधीच एक व्यक्ती धावत्या ट्रेनमधून उरण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे तो प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या गॅपमध्ये जाता जाता वाचतो. संपूर्ण थरार त्या प्लॅटफॉर्मवरील सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झालेला आहे.

व्हायरल होत असलेली संपूर्ण घटना नवी मुंबईमधील (Navi Mumbai) गोंवडी रेल्वे स्थानकामधील आहे. संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील ''@Free Press Journal'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट होताच काही क्षणात असंख्य लाईक्स आणि असंख्य व्ह्यूज (Views) मिळालेले आहेत.

व्हिडिओ (Video) व्हायरल होताच अनेक नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,' गरज काय असते अशांना धावत्या लोकलमधून उतरण्याची'' अशा प्रकारे अनेक यूजर्संनी संतापजनक प्रतिक्रिया (Feedback) केलेल्या आहेत तर अनेकांनी त्या व्यक्तीला वाचवणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचे कौतुक केलेले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात सहा फुटीर खासदारांविरोधात ठाकरेसेनेकडून आंदोलन

FDA Action: 904 धाडी, 34.66 कोटींचा मुद्देमाल जप्त; महिन्याभरात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई

जिम की योगा; वजन कमी करण्यासाठी काय आहे बेस्ट?

Ration Card New Rule: अंत्योदय अन्न योजनेत मोठा बदल; आता रेशनकार्डवर नाव असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मिळेल ७ किलो धान्य

Kalyan : बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेप्रकरणी विधानसभेतील माहिती दिशाभूल करणारी; महाथेरो गौतम रत्न यांचा आरोप

SCROLL FOR NEXT