Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: नऊवारी साडी अन् मराठमोळा साज; लोकलमध्ये तरुणींनी 'आनंद पोटात माझ्या माईना...'वर गायल गाणं; पाहा VIDEO

Mumbai Viral Video: लोकलमधील सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्यात तरुणींनी एका गाण्यावर धम्माकेदार गाणं गायल आहे. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ तुम्ही पाहा तरी.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दररोज सोशल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.मग त्यात जास्तीत जास्त व्हिडिओहे मुंबई लोकलमधील अनेक प्रसंगाचे असतात.मग त्यात वादविवाद असतील तर कधी रेल्वे स्टेशनवर घडलेल्या अपघांताचे व्हिडिओ असतील.मात्र सध्या लोकल ट्रेनमधील अनोखा व्हिडिओ पाहायला मिळत आहे,ज्यात तरुणींनी भर लोकलमध्ये भक्तीचा माहोळ केलेला दिसून येत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ मुंबई लोकलमधील (Local)असल्याचे दिसत आहे. यामध्ये अनेक तरुणींनी पारंपारिक वेषभुषा केलेली दिसून येत आहे.जर तुम्ही नीट पाहिले तर दिसेल तर ट्रेनमध्ये असलेल्या प्रत्येक तरुणींने सारखी साडी परिधान केलेली आहे. काही वेळात सर्व तरुणी एक गाण गाण्यास सुरुवात करतात. एकीच्या पाठी अनेक तरुणी गाण्याला साथ देत आहेत.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ(Video) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील dramatic_me_trush's या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट होताच २ हजारांच्या घरात लाईक्स आले असून मोठ्या प्रमाणात व्हिडिओला व्ह्यूज मिळाले आहेत. शिवाय अनेक कौतुकास्पद प्रतिक्रिया व्हिडिओला मिळालेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Beed Crime : मुंडेंच्या मुलाला कराड समर्थकाची मारहाण, ट्युशनवरून येताना अडवले अन्...

Air Strike : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअरस्ट्राइक; रमजानमध्ये झालेल्या भीषण हल्ल्यात १७ जणांचा मृत्यू

Bribe Case: मोठी बातमी! फाईल पुढे सरकवण्यासाठी ठेकेदाराकडे पैशांची मागणी; 1 लाख 30 हजारांची लाच घेताना मनपा कंत्राटी अभियंत्याला रंगेहाथ पकडलं

३ मुलांना विष पाजले, बायकोचा गळा चिरला आणि स्वत:ला गळफास लावला, कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; टोकाचे पाऊल का उचलले?

SCROLL FOR NEXT