Leopard Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: सिन्नर तालुक्यात पुन्हा बिबट्याचा मुक्तसंचार; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण,पाहा VIDEO

Animal Viral Video: सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओमध्ये अनेक प्राण्यासंबंधित व्हिडिओ देखील असतात.अशातच नाशिकच्या मुसळगावातील एमआयडीसी परिसरातील बिबट्याचा वावरताना व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Leopard Viral Video

सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओमध्ये अनेक प्राण्यासंबंधित व्हिडिओ देखील असतात. हे व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या डोळ्यात पाणी देखील येते तर काही व्हिडिओ पाहून भीती वाटते. अशातच नाशिकच्या मुसळगावातील एमआयडीसी परिसरातील बिबट्याचा वावरताना व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, एमआयडीसी परिसरातील एका रस्तावर बिबट्या चालताना दिसतोय. व्हायरल व्हिडिओ रात्रीच्या वेळेतील आहे. व्हिडिओत बिबट्या त्या रस्त्यावरून चालत येत असतो. दरम्यान मध्येच काही वेळ थांबतो. व्हिडिओच्या शेवटला बिबट्या पुन्हा पाठी फिरून मागच्या वाटेने निघून जातो.

व्हायरल व्हिडिओहा सिन्नर तालुक्यातील मुसळगाव एमआयडीसी परिसरातील इंडियाबुल्स एज येथील ठिकाणाचा आहे. बिबट्याचा व्हिडिओ तेथे तैनात असलेल्या सुरक्षारक्षकाने आपल्या मोबाईमधील कॅमेऱ्यामध्ये कैद केला आहे. सिन्नर तालुक्यात बिबट्या दिसण्याच्या या काही नवीन घटना नाहीत. या आधीही काही दिवसांपूर्वीच खोपडी येथे बिबट्याने एका बालकावर हल्ला केला होता.

बिबट्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. तसेच अनेक ठिकाणी शेअरही केला जातोय. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या बिबट्याला पकडण्याकरीता परिसरात पिंजरा लावावा अशी मागणी नागरिकांकडून होताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Neck Pain Relief: मोबाईल आणि लॅपटॉपच्या अतिवापरामुळे तुमचीही मान दुखतेय? 'या' 5 सवयी आजपासून बदला

Panvel Tourism : पनवेलमध्ये लपलाय निसर्ग सौंदर्याचा खजिना, वीकेंडला लोकल ट्रेन पकडा अन् थेट 'या' स्पॉटवर पोहचा

राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं, VIDEO

Maharashtra Live News Update : आरक्षण बचाव समिती आक्रमक; वर्गवारी थांबवण्यासाठी 8 एप्रिलला कल्याणमध्ये मोर्चा

DC vs MI Result : एकटा रिझवी भिडला, नडला! दिल्लीचा दणदणीत विजय; मुंबई इंडियन्सची सर्वात कमकुवत बाजू आली समोर

SCROLL FOR NEXT