मुंबईतल्या लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लोकल ट्रेनमधल्या अनेक घटना रोज व्हायरल होत असतात. कधी निष्काळजीपणामुळे होणारे प्रवाशांचे अपघाच तर कधी लोकल ट्रेनमधले वाद. व्हायरल होत असलेल्या घटनांचे प्रत्येक व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकऱ्यांपर्यंत पोहचत असतात. सध्या अशातच विना तिकीट प्रवास करणाऱ्या तरुणाची आणि पासधारक प्रवाशांमध्ये जोरादार भांडणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मिळालेल्या माहितीनुसार, विरार वातानुकिलित लोकलमध्ये तिकीट नसलेल्या दोन तरुण प्रवास करत होते. यादरम्यान काही प्रवाशांनी त्यांना एसी लोकल असल्याची माहिती दिली.त्यानंतर पासधारक प्रवासी आणि दोन तरुणांची चांगली बाचाबाची सुरु झाली. त्यानंतर प्रवाशांना भांडण्याचा आवाज ऐकताच ऑन ड्युटी तिकीट तपासणीसाचे पथक कोचपर्यंत पोहोचले. हस्तक्षेप करून हाणामारी रोखली.
मात्र, त्यानंतर या दोन्ही तरुणा टीसीनी तिकीट विचारल्यानंतर तिकीट नसल्याचे सांगितले. तसेच टीसीबरोबरही गैरवर्तन केली. दोन्ही तिकीट नसलेल्या प्रवाशांना पुढील कारवाईसाठी नालासोपारा आरपीएफच्या ताब्यात देण्यात आले.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्मवरील @namaskar_mi_chinmay_jagtap या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. याआधीही लोकल ट्रेनमध्ये विनाटिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
व्हिडिओ व्हायरल होताच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले आहे की,'ट्रेन पकडायला गेल्यास हेच होईल' तर आणखी एका यूजरने लिहिले,आता मला राग येतोय'.अशा अनेक प्रतिक्रिया व्हिडिओवर येत आहेत.
५० टक्यांनी विना टिकीट प्रवासी वाढले...
लोकल ट्रेनमधील ज्याप्रमाणात प्रवाशांची संख्या वाढलेली आहे, त्याच प्रमाणात गेल्या काही दिवसांपासून एसी लोकलमध्ये प्रवाशांची संख्या वाढत जात आहे. परंतू यामध्येही फुकट्या प्रवाशांची संख्याही वाढलेली आहे.एप्रिल ते डिसेंबर २०२३ या कालावधीत ४६ हजारहून अधिक अनधिकृत प्रवाशांना दंड आकारण्यात आला आहे आणि १५४.६७ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा सुमारे ५० टक्के जास्त आहे,
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.