Mumbai Rain Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: ‘मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय का? पावसावर तरुणीचा भन्नाट रॅप, सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Rain Viral Video: मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसावर एका तरुणीने गायलेला रॅप सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रेल्वे बंद, रस्त्यांवर पाणी आणि नागरिकांच्या हालांची कहाणी या गाण्यात आहे.

Manasvi Choudhary

मुंबईसह संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. कामानिमित्त बाहेर पडणाऱ्यांचे अक्षरक्ष: हाल झाले आहेत. जागोजागी पाणी साचले आहे. रस्ते पाण्याखाली गेले असून रेल्वे सेवा देखील ठप्प झाली आहे. याचदरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पावसाचे पाणी रेल्वे रूळावर साचल्याने रेल्वे वाहतूक बंद झाली आहे. रेल्वेरूळावर पाणी साचल्याने ट्रेन जागीच थांबल्या आहेत यामुळे नागरिकांचा खोळंबा झाला आहे. याच परिस्थितीवर आधारित एका तरूणीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरूणी रॅप गात आहे. तरूणी म्हणतेय, 'मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय का?, मुबईचा पाऊस कसा ओव्हरफ्लो..., मुंबईचा माणूस झाला बेहाल बेहाल.., येईच लफडा होतो हरसाल, तरीही मुंबई तु माझ्यासंग गोड बोल.. असं म्हणते आहे. सोशल मीडियावर तरूणीचा हा व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे.

तुम्ही पाहू शकता संपूर्ण रेल्वेरूळ पाण्याने भरलेला दिसत आहे. या पाण्यातून ट्रेनने प्रवाशांनी कसा प्रवास करायचा हा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरवर्षी होणाऱ्या या पावसामुळे हीच 'मुंबईची तुंबई' होत असेल तर प्रशासनाने खबरदारी घेणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतरही रवींद्र धंगेकर आपल्या भूमिकेवर ठाम

एवढीशी जरी शंका असती तर... फलटण आत्महत्या प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांचे महत्वपूर्ण विधान|VIDEO

Heavy Rain : निफाडच्या पूर्व भागात परतीच्या पावसाचा हाहाकार; शेतीचे मोठे नुकसान

Mumbai To Phaltan Travel: मुंबईवरून सातारा फलटणपर्यंत प्रवास कसा कराल? वाचा सोपे मार्ग आणि टिप्स

साताऱ्यानंतर अमरावतीत उच्चशिक्षित तरूणीचा आढळला मृतदेह; राहत्या घरात आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT