Mumbai News Saam Digital
व्हायरल न्यूज

Mumbai News: अबब! मुंबईत पुन्हा आढळला 15 फुटी अजगर, महिनाभरात तिसरी घटना

Aarey Colony Python: मुंबईच्या गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीतील मुख्य रस्त्यावर पंधरा फुटी अजगर आढळून आला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई शहर ओळखलं जातं ते गर्दी, लोकल आणि श्रीमंताचं शहर म्हणून. मात्र हे शहर अलीकडे चर्चेत आलंय ते वेगळ्याच गोष्टींमुळे. इतक्या मोठ्या आणि वर्दळीच्या शहरात सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर सध्या मुंबईसह राज्यभरात चर्चेचा विषय बनला आहे. कधी स्वामिंगपूलमध्ये मगर तर कधी स्टेशन परिसरात आणि वर्दळीच्या ठिकाणी अजगर नजरेस पडत आहेत. त्यामुळे आता शहरात यांची पण वर्दळ वाढणार का? अशी चर्चा सामान्य नागरिकांमध्ये सुरू आहे.

आज पुन्हा मुंबईच्या गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीतील मुख्य रस्त्यावर पंधरा फुटी अजगर आढळून आला. आरे कॉलनीतील महाराष्ट्र कृषी उद्योग बस स्टॉप भागात हा अजगर आढळून आला. त्यामुळे बसची वाट पाहत उभ्या असलेल्या प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. अजगर रस्त्यावर पंधरा ते वीस मिनिट थांबून राहिल्यामुळे काही काळ दोन्ही बाजूला वाहने थांबून ठेवावी लागली. याबात वन विभागाला कळविण्यात आले. मात्र वन विभागाचे कर्मचारी येण्यापूर्वीच अजगर आपल्या नैसर्गिक अधिवासात निघून गेला. त्यामुळे बस स्टॉप वर उभ्या असलेल्या नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काही दिवसांपूर्वी दादरमधील शिवाजी पार्क परिसरात असलेल्या स्वीमिंग पूलमध्ये पहाटेच्या सुमारास २ फूट मगरीचं पिल्लू आढळून आले होते. या परिसरात मोठी वर्दळ असते. त्यामुळे याची बरीच चर्चाही झाली. ही घटना ताजी असतानाच नवी मुंबईतील जुईनगर परिसरात १५ फूट लांब अजगर सापडला होता. लोकल पकडण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांची घाबरगुंडी उडाली होती. दरम्यान शहरात कामावर जाणाऱ्या नागरिकांची रात्री अपरात्री ये जा सुरू असते. त्यातच अशा प्रकारच्या घटना वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tesla Cars: ५०० किमी पेक्षा अधिक रेंज देणाऱ्या टेस्लाच्या सर्वोत्तम ५ मॉडेल्स

HSL Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार नोकरी, पगार १,८०,००० रुपये, अर्ज कुठे अन् कसा करावा?

Vidhan Bhavan : विधिमंडळातील हाणामारी, जितेंद्र आव्हाडांच्या मुलीला टार्गेट; सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत | VIDEO

'मुंबई के समंदर में डुबे डुबे के मारेंगे..' राज ठाकरेंच्या ओपन चॅलेंजवर निशिकांत दुबेंची पहिली प्रतिक्रिया | MNS v/s BJP

Maharashtra Live News Update: वाटद एमआयडीसी विरोधात आज होणार शेतकऱ्यांची जनआक्रोश सभा

SCROLL FOR NEXT