Local Train Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Local Train Viral Video: ट्रेन पकडण्यासाठी तरुणाचा जीवाशी खेळ; गर्दीत अडकला आणि पतंगासारखा हवेत लटकला...पाहा थरारक VIDEO

Viral Video: मुंबई लोकल ट्रेनच्या गर्दीचे भीषण वास्तव दाखवणारे अनेक व्हिडिओ आजवर समोर आलेत.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai Local Train Viral Video:

मुंबईची लोकल ट्रेन आणि त्यातील गर्दी मुंबईकरांच्या आयुष्यातला एक भाग बनली आहे. या गर्दीतून वाट काढत मुंबईकर दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. दिवसाची सकाळ आणि संध्याकाळ याच गर्दीतून करावी लागते. अशात मुंबई लोकल ट्रेनच्या गर्दीचे भीषण वास्तव दाखवणारे अनेक व्हिडिओ आजवर समोर आलेत. सध्या देखील एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय. (Latest Marathi News)

या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, प्लॅटफॉमवर ट्रेन (Local Train) उभी आहे. या ट्रेनमध्ये जागा पकडण्यासाठी एका तरुणाने दरवाजाजवळ वरच्या बाजूने पकडून ठेवले आहे. तो येथून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने वरती पकडल्याने तो पूर्णता लटकलेल्या अवस्थेत आहे. पाय खाली टेकलेले नसल्याने त्याला आतामध्ये जाणे जमत नाहीये.

अशात हात सोडले तर पुन्हा चढायला नाही मिळणार म्हणून तरुणाने दोन्ही हाताने वरती घट्ट धरले आहे. अशात यावेळी इतर व्यक्ती ट्रेनमध्ये चढण्यासाठी घाई करत आहे. या तरुणामुळे इतरांना देखील आतमध्ये चढता येत नाहीये. एवढ्या गर्दीत तरुण एखाद्या लटकलेल्या पतंगाप्रमाणे हवेत उडताना दिसतोय.

मोठे प्रयत्न करुनही त्याला चढता येत नाही. एवढ्या गर्दीत शेवटी काही व्यक्ती त्याला ट्रेनच्या दरवाजा बाहेर खेचतात आणि तो खाली येतो. व्हायरल व्हिडिओमधून पुन्हा एकदा लोकल ट्रेनचं भीषण वास्तव समोर आलं आहे. आतापर्यंत या व्हिडिओला ९० हजारांहून अधिक व्ह्युव्ज आलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT