MP Police Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

MP Police Viral Video : FIR नोंद करायला महिना लावला; हताश पीडित महिलेने पोलीस ठाण्यातच अधिकाऱ्याची केली आरती, पाहा Video

MP Police Station Viral Video : जवळपास महिनाभर पोलीस ठाण्याच्या पायऱ्या झिजवूनही पीडित महिलेची पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. त्यामुळे हताश झालेल्या एका महिलेने पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांची आरती केली.

Sandeep Gawade

MP Police Viral Video

जवळपास महिनाभर पोलीस ठाण्याच्या पायऱ्या झिजवूनही पीडित महिलेची पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. त्यामुळे हताश झालेल्या एका महिलेने पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांची आरती केली. मध्य प्रदेशातील रेवामध्ये हा प्रकार घडला असून पोलीस खात्याला नामुष्कीला सामोरं जावं लागलं आहे. संबंधित महिलेने पोलीस अधिकाऱ्याची आरती केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायलर होत आहे. आता तरी पोलीस या प्रकरणाचा योग्य तपास करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कोणत्याही गंभीर गुन्ह्यातील तक्रार तात्काळ दाखल करून घेण्यात यावी, अशी कायद्यात तरतूद आहे. मात्र पीडित महिला २६ दिवस पोलीस ठाण्यात येऊन तक्रार देण्याचा प्रयत्न करत होती. तरीही पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. २६ दिवसांनंतर तक्रार दाखल करून घेतली. मात्र त्यानंतरही पोलिसांनी प्रकरणाचा तपास करावा लागेल, असं उत्तर दिलं. त्यामुळे हताश झालेल्या पीडित महिलेने आरती आणि हार घेऊन पोलीस ठाणं गाठलं आणि पोलीस अधिकाऱ्याची आरती केली.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत एक महिला आणि एक व्यक्ती लहान मुलीस पोलीस ठाण्यात येताना दिसत आहे. त्यांच्या हातात आरती आणि हार आहे. पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यांची समजूत काढताना दिसत आहे. महिलेसोबत आलेली व्यक्ती व्हिडीओमध्ये या प्रकरणाची माहिती देत आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांना व्हिडीओ काढताना रोखलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.

पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारींचा अनेक वेळा योग्य तपास होत नसतो. कित्येक दिवस उलटूनही काहीही कृती केली जात नाही. तशी यंत्रणा राबवली जात नाही. त्यामुळे गुन्हेगार मात्र मोकाट असतात. बराच कालावधी उलटल्यानंतर पुरावे नष्ट होण्याची शक्यता अधिक असते. बऱ्याचवेळा पीडित व्यक्तीला न्याय मिळत नाही. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पोलीस प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रेल्वे प्रवाशांची सुरक्षा अजुनही वाऱ्यावर; लोकल प्रवाशाकडे सापडला 35 सेमीचा चाकू

Maharashtra News Live Update: विद्यार्थ्यांचे आंदोलन योग्य; त्यांनी हिंसा केली नाही - राहुल गांधी

Nag Panchami 2026: नागपंचमीला तवा - कढई का वापरू नये? ही माहिती वाचून बसेल धक्का

Shravan Green Saree Design: श्रावणात हिरव्या साडीची जादू; ट्राय करा ग्रीन साडीचे हे 7 लेटेस्ट ट्रेंडी डिझाइन्स

ट्रेडिशनल ते मॉडर्न, ठुशी मंगळसूत्राच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स

SCROLL FOR NEXT