Tiger Walk On Busy Road Saam TV
व्हायरल न्यूज

Tiger Walk On Busy Road: भाग भाग भाग शेर आया शेर...! वाघाच्या गळ्याला पट्टा बांधून वॉकिंगला निघाला तरुण, नागरिकांची पळापळ

Man Walk With Tiger On Busy Road: एका तरुणाने कुत्र्याला जसं मॉर्निंग वॉकसाठी नेतात तसं वाघाला वॉकसाठी आणलं आहे. तरुण वाघाला घेऊन ज्या रस्त्यावर आलाय तो रस्ता देखील माणसांच्या गर्दीने गजबजलेला आहे.

Ruchika Jadhav

Viral Video:

प्राण्यांवर प्रेम करणाऱ्या त्यांना लळा आणि जीव लावणाऱ्या अनेक व्यक्ती आहेत. काही जण असं म्हणतात की प्रमाणे अगदी वाघ, सिंह, अजगर अशा हिंस्र प्राण्यांशी देखील मैत्री करता येते. अशात सोशल मीडियावर काळजात धडकी भरवणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

समजा तुम्ही रस्त्याने चालत आहात आणि तुमच्या समोर एखादी व्यक्ती त्यांचा पाळीव कुत्रा घेऊन आली, तर फार धांदळ उडते. यात जर एखादी व्यक्ती तुमच्यासमोर आपल्या वाघाच्या गळ्यात साखळी टाकून तुमच्यासमोर आली तर? नुसता विचार करूनच अनेकांना घाम फुटला असेल. मात्र प्रत्यक्षात असं घडलं आहे. एका तरुणाने कुत्र्याला जसं मॉर्निंग वॉकसाठी नेतात तसं वाघाला वॉकसाठी आणलं आहे.

वाघाचा (Tiger) हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अगदी कुत्र्याच्या गळ्यात बांधतात तशी साखळी वाघाच्या गळ्यात बांधून तरुणाने त्याला वॉकसाठी बाहेर आणलंय. तरुण वाघाला घेऊन ज्या रस्त्यावर आलाय तो रस्ता देखील माणसांच्या गर्दीने गजबजलेला आहे.

आजूबाजूला माणसं आणि दुकानं तसेच सर्व परिसर पाहून हा वाघ देखील बावरलाय. वाघ जागेवरच उसळ्या मारतो आहे. एखाद्या व्यक्तीवर तो कधी झडप घालेलं आणि कुणाचा कधी फडशा पडेल अशी भीती या व्हिडीओमध्ये (Video) असलेल्या लोकांच्या मनात दिसतेय. वाघ आजूबाजूने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर देखील झडप घालण्याचा प्रयत्न करत आहे.

@tiptopyatra या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. वाघाला घेऊन चाललेला तरुण प्राणीमित्र असल्याचं दिसत आहे. त्यामुळे वाघ त्याला काहीच करत नाही. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये संताप व्यक्त केला आहे. तू वेडा आहेस का? असा प्रश्न एकाने केलाय. पोलिसांनी या व्यक्तीवर कारवाई केली पाहिजे. तसेच हा व्हिडीओ पाकिस्तानमधील असल्याचं एकाने आपल्या कमेंटमध्ये म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT