Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video: सापाला किस करण्याचं धाडस तरुणाच्या जीवावर बेतलं; घटनेचा थरारक VIDEO व्हायरल

Man Kissing Snake Viral Video: मी महादेवाचा आवतार आहे मला काहीच होऊ शकत नाही, असं म्हणत त्याने सापाला किस केलंय.

Ruchika Jadhav

Uttar Pradesh:

सापा हा विषारी प्राणी आहे. त्यामुळे साप दिसताच नागरिक आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागतात. मात्र एका मद्यपी तरुणाने मी भोलेनाथ देवाचा अवतार असल्याचं म्हणत सापाशी खेळण्याचं धाडस केलंय. तरुणाने केलेल्या या कृत्यामुळे सापाच्या दंशात त्याता मृत्यू झाला आहे. या घटनेचा एक धक्कादायक व्हिडीओ देखील समोर आलाय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या देवरीया येथे ही घटना घडली आहे. रोहित असं मृत तरुणाचं नाव आहे. गेल्या शनिवारी तरुण रात्रीच्यावेळी नशेत घरी आला. घराबाहेर एक बारीक साप असल्याचं त्याला दिसलं. त्यानंतर या तरुणाने सापाला उचलून घेतलं आणि गरगर फिरवलं.

सापासोबत या तरुणाने एक व्हिडीओ देखील रेकॉर्ड केलाय. व्हिडीओमध्ये तुम्हीही पाहू शकता की, तरुणाने सापाला हातात घट्ट पकडलंय. त्यानंतर त्याने सापाची शेपटी पकडून तो सापाला खाली लोंबकळत ठेवतोय. यावेळी स्वत:ची सुटका व्यावी म्हणून साप धडपडताना दिसतोय.

व्हिडीओमध्ये पुढे तुम्ही पाहू शकता की तरुण खाली बसलाय आणि त्याने सापाची गाठ मारलीये. पुढे तो सापाला आपल्या हातात पकडून किस करण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी मी महादेवाचा अवतार आहे. मला काहीच होऊ शकत नाही, असं म्हणत त्याने सापाला किस केलंय. मात्र यामध्ये सापाने तरुणाच्या जीभेचा चावा घेतला आहे. या घटनेमध्ये उपचारावेळी तरुणाचा मृत्यू झालाय.

सोशल मीडियावर आजवर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. मद्यपी तरुणांच्या अतरंगीपणामुळे आजवर अनेकांनी आपला जीव गमावलाय. काही दिवसांपूर्वी देखील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये एका तरुणाने दुचाकी चालवताना सापाला आपल्या हातात पकडलं होतं. यावेळी त्या तरुणाने देखील मद्यप्राषण केलं होतं. सापाच्या दंशाने त्याचाही मृत्यू झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad Fort: रायगडाचा महादरवाजा शत्रूला लांबून कधीच दिसू नये असा का बांधला होता?

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी मनिषा हवालदारची जेलमध्ये रवानगी

Rajeev Verma: अमिताभ बच्चन यांचे साडू, प्रसिद्ध अभिनेते अचानक बॉलिवूडपासून झाले दूर; आता चालवतात हॉटेल

एकही केस गळणार नाय! रात्री झोपण्यापूर्वी करा 'हा' 1 सोपा उपाय; केस होतील लांब आणि मजबूत

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा तळतळाट महायुतीला पडेल महागात; वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप

SCROLL FOR NEXT