Omkar Bhojane Dance Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Omkar Bhojane Dance Video: हास्यजत्रेतील ओमकार भोजनेने 'चंद्रा' गाण्यावर केली जबरदस्त लावणी; डान्स पाहून तुम्हीही माराल शिट्ट्या;VIDEO VIRAL

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता ओमकार भोजनेची सोशल मीडियावर खूप जास्त चर्चा असते. ओमकार भोजने नेहमी आपल्या कॉमेडीने चाहत्यांना खळखळून हसवत असतो. ओमकार भोजने आतापर्यंत कॉमेडी शो, चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तुम्ही ओमकार भोजनेचा डान्स कधी पाहिलायत का? ओमकार भोजनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात त्याने चंद्रा या गाण्यावर नऊवारी साडी नेसून जबरदस्त डान्स केला आहे.

ओमकार भोजनेने अमृता खानविलकरच्या 'चंद्रा' या गाण्यावर अगदी सेम टू सेम डान्स केला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओत सर्वप्रथम ओमकार भोजने स्टेजवर एन्ट्री घेतो.त्याने काळ्या रंगाची नऊवारी नेसून त्यावर साजेशी ज्वेलरीदेखील घातली आहे. त्याचा हा लूक पाहून प्रेक्षकांना धक्काच बसतो. यानंतर ओमकार भोजनेचा डान्स पाहून प्रेक्षक खूपच आश्चर्यचकित होतात.

व्हायरल व्हिडिओत ओमकार भोजने 'चंद्रा' गाण्यावर डान्स करत एन्ट्री घेतो. त्यानंतर ओमकार भोजने चंद्रा गाण्यावर जबरदस्त स्टेप्स करतो. हुबेहुब अमृता खानविलकरने केलेल्या डान्ससारख्याच स्टेप्स ओमकारने केल्या आहेत. ओमकारची ही लावणी बघूण प्रेक्षकांमध्ये बसलेले स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे, भरत जाधव यांनी उभे राहून टाळ्या वाजवल्या. ओमकारचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

ओमकार भोजने सध्या कलर्स मराठीवरील 'हसताय ना हसायलाच पाहिजे' या कार्यक्रमात काम करत आहे. या कार्यक्रमातूनदेखील तो प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT