No blanket ban on Ola and Uber in Maharashtra; authorities act only against illegal bike taxi services. saam tv
व्हायरल न्यूज

राज्यात ओला-उबेरवर बंदी? सरकारचा कारवाईचा धडाका?

Fact Check: महाराष्ट्रात ओला-उबेरवर बंदी घालण्यात आल्याचा व्हायरल दावा खोटा ठरला आहे. सरकारकडून फक्त अवैध बाईक टॅक्सीवर कारवाई करण्यात येत असून, अधिकृत कॅब सेवा सुरूच राहणार आहेत.

Sandeep Chavan

ऐकलंत...राज्यात आता ओला-उबेरवर बंदी घातली जाणार असल्याचा दावा करण्यात आलाय...अवैध वाहतूक होत असून, बाईक टॅक्सीवर कारवाई केली जात असल्याचा दावा करण्यात आलाय...पण, खरंच सरकारने सरसकट ओला-उबेरवर बंदी घातलीय की फक्त बाईक टॅक्सीवर बंदी घातलीय...? असा सवाल उपस्थित होतोय...कारण, रोज हजारो लोक ओला-उबेरने प्रवास करतात...त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...

...हा व्हिडिओ व्हायरल होत असल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली...रोजच बरेच जण ओला-उबेर, रॅपिडो बाईक टॅक्सीने प्रवास करत असतात...त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली...याबाबत परिवहन मंत्रीच खरी माहिती देऊ शकतात...पण, खरंच राज्यात ओला-उबेर टॅक्सींवर बंदी घालण्यात आलीय का...? बंदी घालणार असेल तर त्याचं कारण काय आहे...? याची माहिती मिळवण्यासाठी आमचे प्रतिनिधी परिवहन मंत्र्यांना भेटले...आणि त्यांच्याकडून याबाबत अधिक माहिती जाणून घेतली...त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहयात...

अवैधपणे बाईक टॅक्सी वापरणाऱ्यांवर कारवाई

वेळ देऊनही कागदपत्र सादर न केल्याने बंदी

अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी निर्णय

बेकायदेशीर अॅप परिवहन विभागाकडून रद्द

ओला, उबेर बाईक टॅक्सीवर बंदी घालण्यात आली

सरसकट ओला-उबेर टॅक्सीवर बंदी घातलेली नाही...मात्र, जे अवैधपणे बाईक टॅक्सी चालवत आहेत त्यांच्यावर बंदी घालण्यात आलीय...अवैध अॅपही डिलीट करण्याचे आदेश परिवहन मंत्र्यांनी सायबर एक्सपर्टला दिलेयत...पण, राज्यात ओला-उबेरवरच बंदी घालणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

SCROLL FOR NEXT