LPG Cylinder Dance Saam TV
व्हायरल न्यूज

LPG Cylinder Dance: काय बॅलेन्स आहे राव! डोक्यावर सिलिंडर टाकी घेऊन महिलेचा डान्स, खतरनाक VIDEO व्हायरल

Ruchika Jadhav

Viral Video:

अनेकांच्या घरी एलपीजी गॅस सिलिंडर येतो. सिलिंडरची टाकी घरी आल्यावर ती किचनपर्यंत नेताना भल्याभल्यांना दम लागतो. कारण या टाकीचं वजन फार जास्त असतं. अशात सध्या सोशल मीडियावर एका महिलेचा काळजात धडकी भरवणारा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये महिलेने चक्क गॅस सिलिंडर डोक्यावर उचलून घेतलाय.(Latest Marathi News)

सोशल मीडियावर महिलेचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये महिलेने साधा पोषाख परिधान केलाय. आपल्या घरातच तिने खतरनाक स्टंट डान्स केलाय. महिलेने डोक्यावर एलपीजी सिलिंडरची टाकी उचलून घेतली आहे. टाकी उचलून ती मस्त डान्स करत आहे. तिला पाहून एका क्षणासाठी काळजात धडकी भरल्यासारखे वाटते.

ही महिला आता पडते की काय, ती पडलीतर तिला बेकार दुखापत होईल असे विचार मनात येतात. मात्र मिहलेच्या चेहऱ्यावर जराही चिंता किंवा भीती दिसत नाहीये ती अगदी सहज डान्स करतेय. फक्त डान्स करून ती थांबत नाही तर, जमिनीवर एक स्टीलचा हंडा ठेवला आहे. काही वेळाने महिला त्या हंड्यावर देखील चढते.

तिच्या नृत्याने अनेकांच्या काळजात धडकी भरलीये. सध्या महिलेचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांचे मनोरंजन करत आहे. महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. @karagam_durga या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय.

इंस्टाग्राम अकाउंटवर या महिलेचा आणखीन एक व्हिडीओ आहे. दुसऱ्या व्हिडीओमध्ये देखील ती भन्नाट स्टंट करतेय. तिला बॅलेन्स कमालीचा आहे. सिलिंडर डोक्यावर घेऊन ही महिला चक्क एका पायावरही उभी राहिलीये. तिचा व्हिडीओला लाखो लाईक्स आलेत. नेटकऱ्यांनी यावर कमेंट्समध्ये तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय. तर अनेकांनी काळजी व्यक्त केलीये.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT