Food Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: किचनमध्ये उंदरांचा सुळसूळाट; त्यातच आचऱ्याने बनवलं जेवण, VIDEO पाहून बाहेरच खाण विसरुन जाल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Shocking Viral Video

सध्या प्रत्येकाला बाहेरचे चमचमीत असणारे पदार्थ खाण्यास आवडतात. त्यामुळे आपसूकच आपले मन रस्त्यावरील खाद्यपदार्थ विकणाऱ्या गाड्यांकडे ओढले जातात. मात्र अनेक ठिकाणी आपली खाण्याची इच्छा पूर्ण होत नाही कारण खाद्यपदार्थ विकणाऱ्या गाड्यांकवर असणारी अस्वच्छता. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात जेवण बनवण्याच्या जागी स्वच्छतेचा जराही नामोनिशाण दिसत नाही. हा व्हिडिओ पाहून तुम्ही कुठेही गेलात तरी खाण्याच्याआधी दहा वेळा विचार नक्कीच कराल.

व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून याआधीही आपल्याला या संबंधित अनेक व्हिडिओ पाहायला मिळालेत. कधी गटाराच्या पाण्यात भांडी धूताना तर कधी पाणी पुरीचे असलेले अस्वच्छ पाणी. मात्र या व्हिडिओने नेटकऱ्यांना धक्काच बसला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत आपण पाहू शकतो की, एक व्यक्ती एका घरातील मोकळ्या जागेत मांडी घालून बसलेला असून तो त्याच्या समोर असलेल्या कढईत पुऱ्या तळताना दिसत आहे. त्याच्या बाजूला काही जेवणाची पातेली, परात दिसत आहे तसेच त्या व्यक्तीच्या मागे बाजूला एक चपासाठी मळलेले कणिकेचे पातेलं आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे त्या खोलीमध्ये जेवणाच्या पातेलांवरुन उंदीर फिरताना दिसत आहेत. त्यातील एक उंदीर व्यक्ती तळत असताना त्याच्यापाठी ठेवलेल्या कणकेच्या पातेल्यात जाऊन कणिक खात आहे. सर्व खोली अत्यंत घाणेरडी असल्याचे आपल्याला व्हिडिओत दिसतेय. मात्र खोलीत उंदीर फिरत असताना तेथिलं व्यक्तींना काहीही वाटत नाही.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सर्व धक्कादायक प्रकार दाखवणारा व्हिडिओ एक्स अॅपवरील @chiragbarjatyaa या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला असून व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की,'कृपया लग्न-समारंभात, बाहेरच्या ठिकाणी अन्न कुठे आणि कसे बनत आहे हे तपासून पाहा, हा असा अस्वच्छपणा वाढू देऊ नका'. मात्र हा किळसवाणा प्रकार कुठला आहे हे समजू शकल नाही.

व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच हजारोंच्या घरात व्हिडिओला व्ह्यूज मिळाले आहेत तसेच विविध सोशल प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ शेअरही केला जातोय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh Uday: ऑक्टोबर महिन्यात बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

Rain Alert : मराठवाडा-विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; मुंबई-पुण्यात कसं असेल वातावरण? वाचा वेदर रिपोर्ट

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT