True friendship: Brave dog saves companion from leopard attack in Ambegaon village, CCTV footage viral. 
व्हायरल न्यूज

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

Leopard Attacks Dog : पुण्यातील आंबेगावमध्ये एका बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला, पण दुसऱ्या कुत्र्याच्या धाडसी निष्ठेमुळे शिकारी बिबट्याला माघार घ्यावी लागली. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला हा अविश्वसनीय मैत्रीचा आणि धाडसाचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय.

Bharat Jadhav

  • आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव घोडे गावात बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला.

  • जखमी कुत्र्याला त्याच्या साथीदार कुत्र्याने मदत केली.

  • कुत्र्यांच्या निडर मैत्रीसमोर बिबट्यालाही माघार घ्यावी लागली.

रोहिदास गाडगे, साम प्रतिनिधी

आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव घोडे गावात मैत्रीचा धडा देत कुत्र्यांच्या धाडसाने बिबट्यालाही घाबरवलंय! कुत्र्यांच्या निडर मैत्रीसमोर बिबट्यालाही माघार घ्यावी लागली! एकटा जखमी झाला तरी दुसऱ्या सहकाऱ्याने दिलेलं बळ, ही खरी मैत्रीची ताकद सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

शेतकरी महादेव जगदाळे यांच्या घरासमोर दबक्या पावलांनी शिकारीच्या शोधात बिबट्या आला. त्याने रखवालीसाठी असलेल्या कुत्र्यावर अचानक हल्ला केला. कुत्रा आणि बिबट्याशी जीवघेणी झुंज सुरू झाली. बिबट्याच्या तीक्ष्ण नखांनी आणि दातांनी कुत्र्याला जखमी केलं, पण कुत्र्याने हार मानली नाही.

कारण पिंजऱ्यात अडकलेला दुसरा सहकारी कुत्रा हंबरडा फोडून त्याला धीर देत होता. तु एकटा नाहीस. मी आहे सोबत! अशी जणू ती मैत्रीची हाक जखमी कुत्र्याला बळ देत राहिली अखेर मैत्रीच्या या नात्याची ताकद इतकी प्रचंड होती की, बिबट्यालाही मागे हटावं लागलं धुम ठोकावी लागली.

हा थरार आणि भावनिक क्षण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून,प्राण्यांच्या या नि:स्वार्थ मैत्रीने प्रत्येकालाच एक धडा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 Final: भारत आणि पाकिस्तानमध्ये फायनल,आशिया कप स्पर्धेत कोण बाजी मारणार?

Kendra Trikona Rajyog: 30 वर्षांनंतर शनीने बनवला पॉवरफुल योग; 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा

Todays Horoscope: 'या' राशीच्या व्यक्तींनी मनाचा कौल घेऊन पुढे जावं; वाचा राशीभविष्य

Hans Mahapurush Rajyog: 100 वर्षांनी दिवाळीला गुरु बनवणार हंस राजयोग; 'या' राशींना बिझनेसमधून मिळणार नफा

PAK vs BAN: बांगलादेश आऊट; फायनलमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार

SCROLL FOR NEXT