Child driving Saam Tv
व्हायरल न्यूज

Child driving: संतापजनक! चिमुकल्याच्या हातात दुचाकी, भरधाव चालवताना काढला व्हिडिओ

Little boy Riding A Bike On The Road: सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यात एक लहान चिमुकला वाहन चालवत आहे. नक्की हा प्रकार कुठला आहे ते पाहा.

Tanvi Pol

Shocking Video: खरंच, हा प्रकार पाहून कोणीही संतापलेशिवाय राहत नाही. रस्त्यावर एका लहान चिमुकल्याच्या हातात वाहन दिल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये लहान मुलगा रस्त्याच्या मध्यभागी वाहन चालवताना दिसतो, ज्यामुळे आसपासच्या लोकांमध्ये भीती आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे.

घडलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक महामार्ग दिसत आहे. या महामार्गावर अनेक जड आणि मोठी वाहन जात आहेत, अशातच एक व्यक्ती बाईक (Bike) चालवत येत असतो आणि त्याच्या पुढे एक चिमुकला बसलेला असतो. काही वेळात तो व्यक्ती बाईकच्या हॅंडलवरील हात हटवतो आणि लहान मुलाच्या हातात देतो. काही मिनिटं लहान चिमुकला बाईक चालवताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडिओ नक्की कुठल्या शहरातील आहे किंवा त्या व्यक्तीची ओळख अद्याप समजलेली नाही. पण हा व्हिडिओ पाहून प्रत्येकजण संताप व्यक्त करत आहेत. gana__song_only या अकाउंटवर व्हिडिओ अपलोड होताच अन्य ठिकाणी संतापजनक प्रतिक्रिया देत शेअर करण्यात आलेला आहे.

या प्रकारामुळे केवळ त्या लहान मुलाला नाही तर इतर वाहनचालकांनाही मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता होती. रस्त्यावरील नियम पाळणे शिवाय सुरक्षा सुनिश्चित करणे आवश्यक असते. मात्र, हे सगळे पालकांनी आपल्या लहानग्यांना योग्य मार्गदर्शन देऊनच शक्य आहे. अशा प्रकारे लहान मुलांना असं मोठं आणि धोकादायक (Dangerous) वाहन हाताळण्यास लावणे, ही गंभीर जबाबदारीची चूक आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

WhatsApp वर 'Online' दिसणं टाळायचंय? ही सेटिंग बंद करा, फॉलो करा 'हे' टिप्स

Sunday Horoscope Update : चूक केली असेल तर लगेच माफी मागा…; वाचा आजचे राशीभविष्य

Idli Recipe : रात्रीचा भात भरपूर उरलाय? झटपट बनवा मऊसर इडली

Nirmiti Sawant : निर्मिती सावंत यांचे छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक; डॅशिंग लूकनं वेधलं लक्ष, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT