Dance Viral video Saam TV
व्हायरल न्यूज

Dance Viral video: धक-धक करने लगा...गाण्यावर तरुणी दिलखुलास होऊन नाचली, पाहा भन्नाट व्हिडिओ

Dance Video: सध्या सोशल मीडियावर एका तरुणीच्या डान्सचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Dhak Dhak Karne Laga: रोजच्या धकाधकीच्या जीवनात चेहऱ्यावर थोडं हसू येण्यासाठी प्रत्येक व्यक्ती मनोरंजनाच्या साधनांकडे वळतो. अशात मनोरंजनाच्या या साधनांमध्ये कुणी चित्रपट पाहतं, तर कुणी पुस्तक वाचतं. तरुण मुलं-मुली शक्यतो मनोरंजन म्हणून नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टीव दिसतात. अशात सध्या सोशल मीडियावर एका तरुणीच्या डान्सचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. (Latest Marathi Video)

अभिनेत्री माधूरी दिक्षितने आपल्या काळात अनेक रोमँटीक गाण्यांवर जबरदस्त डान्स केला आहे. तिचं धक धक करने लगा हे गाणं तुम्ही सर्वांनी ऐकलंच असेल. या गाण्याने त्या काळात तरुणाईला वेड लावलं होतं. आजही या गाण्याची क्रेज काही कमी झालेली नाही. त्यामुळे आता एका तरुणीने या गाण्यावर ताल धरला आहे. तिच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

गाण्यात तरुणीने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. तसेच साडीवर शोभेल असा गुलाबी ब्लाउज परिधान केला आहे. हातातही तिने गुलाबी रंगाच्या बांगड्या आणि मोठ्या हिऱ्यांचे कानातले घातले आहेत. सुंदर मेकअप अन् मोकळे केस सोडून तरुणी एका अभिनेत्रीपेक्षाही सुंदर दिसत आहे. तिने धक धक करने लगा या गाण्यावर डान्सचा व्हिडिओ रेकॉर्ड केलाय.

धक धक करने लगा या गाण्यात माधूरीने जसा ठेका धरला होता अगदी त्याच प्रकारे ही अभिनेत्री देखील एकापेक्षा एक भन्नाट डान्स स्टेप्स करत आहे. श्रीतमा बैद्य असं या तरुणीच्या युट्यूब चॅनलचं नाव आहे. तरुणी एक डान्सर असून सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते आहेत. तिने आपल्या युट्यूब चॅनलवर डान्सचे अनेक व्हिडिओ पोस्ट केलेत. अशात धक धक करने लगा या गाण्यावरील तिचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय. युजर्स तिच्या डान्सचं कौतुक करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Travel : ट्रेकिंगप्रेमींसाठी 'हे' आहे खास ठिकाण, येणारा वीकेंड पुण्यात प्लान करा

Girija Oak Photos : "मन धावतंय तुझ्याच मागे..."; नॅशनल क्रश गिरिजा ओकचे आरस्पानी सौंदर्य

Maharashtra Live News Update: निवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांना ८ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Lakhpati Didi Yojana: महिलांसाठी खास योजना! कोणत्याही व्याजाशिवाय मिळणार ५ लाखांचं कर्ज; योजनेबद्दल सविस्तर माहिती वाचा

Accident : रत्नागिरी- कोल्हापूर महामार्गावर भीषण अपघात, ५० प्रवाशांना घेऊन जाणारी खासगी बस दरीत कोसळली

SCROLL FOR NEXT