Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video: एकच नंबर! पतंग उडवताना फिरकी पकडण्याची चिंता मिटली; दुकानदारानं शोधला देसी जुगाड

Kite Charkhi Video: हे बटन दाबल्यावर धाग्याला ढिल मिळते आणि धागा टाइट देखील होतो. पतंग हवेत उडत असताना तीला योग्य वेळी ढील मिळणे गरजेची असते. फिरकी फिरवणाऱ्या व्यक्तीचं गणित बिघडलं की पतंग खाली कोसळते.

Ruchika Jadhav

Kite Charkhi:

मकरसंक्रात आता काही दिवसांवर आली आहे. सर्वजण मकरसंक्रांतीच्या दिवशी आकाशात पतंग उडवतात. पतंग उडवण्याच्या मोठ्या स्पर्धाच रंगतात. आता पतंग उडवायची म्हटल्यावर एका व्यक्तीला धाग्याची फिरकी धरून उभं रहावं लागतं. सहसा मुलं पतंग उडवताना मुलींना फिरकी धरून उभं करतात. त्यामुळे एका दुकानदाराने यावर देसी जुगाड शोधला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पतंगीच्या फिरकीला या व्यक्तीने एक बटन बसवलं आहे. हे बटन दाबल्यावर धाग्याला ढिल मिळते आणि धागा टाइट देखील होतो. पतंग हवेत उडत असताना तीलायोग्य वेळी ढील मिळणे गरजेची असते. फिरकी फिरवणाऱ्या व्यक्तीचं गणित बिघडलं की पतंग खाली कोसळते.

अनेकदा यावरून पतंग उडवणारा आणि फिरकी पकडणारा या दोघांमध्ये वादही होतात. तसेच पतंग उडवण्याचा खेळ प्रत्येकाला मनसोक्त खेळता यावा म्हणून या व्यक्तीने हा देसी जुगाड शोधून काढला आहे. फिरकीच्या आतमध्ये एक मशिन बसवण्यात आलं आहे. त्यावरच ही फिरकी बटनाच्या सहाय्याने गरगर फिरत आहे.

सोशल मीडियावर @Siddharthshah या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होतोय. या फिरकीची किंमत १३०० रुपये आहे. तुम्हाला देखील ही फिरकी खरेदी करायची असेल तर वर दिलेल्या इंस्टाग्राम अकाउंटवर तुम्ही भेट देऊ शकता.

फिरकीची किंमत ऐकून यावर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्यात. एवढी महाग फरकी कोण घेणार असं एकाने लिहिलं आहे. तर आणखी एक युजरने ही जुनी संकल्पना असल्याचं म्हटलं आहे. असे असले तरी या व्हिडीओला ७ लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. त्यामुळे यंदाच्या मकरसंक्रांतीला तुम्ही देखील एकट्याने पतंग उडवायचं ठरवलं असेल तर ही फिरकी फार फायदेशीर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagarparishad Election: बारामती, फलटण, अंबरनाथसह २३ नगरपरिषद- नगरपंचायतीसाठी आज मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; उद्या निकाल

Maharashtra Live News Update : अंबरनाथ मध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप

Municipal Election : अंबरनाथमध्ये शिंदेंचे बोगस मतदार, मंगल कार्यालयात शेकडो महिला आढळल्या, भाजप-काँग्रेसचा आरोप

Pension News : पेन्शनधारकांना केंद्र सरकारचा दिलासा, NPS मधून ८० टक्के रक्कम काढता येणार

२० डिसेंबरपासून नवी सुरुवात! धनु राशीत चंद्राचा प्रभाव; ‘या’ ४ राशींचं नशीब चमकणार

SCROLL FOR NEXT