King Cobra Viral Video Saam tv
व्हायरल न्यूज

King Cobra Viral Video: घरात सापडला १६ फूट लांबीचा किंग कोब्रा; व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल

king Cobra Viral video: किंग कोब्राचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Vishal Gangurde

Snake Viral Video: काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. न्हाणी घरात साप आढळल्याचा हा व्हिडिओ होतो. हा साप आंघोळीसाठी जाणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला डसण्याची शक्यता होती. सापाचा भयानक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. अशातच आणखी एक किंग कोब्राचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)

जगातील सर्वात विषारी सापांपैकी एक असलेल्या किंग कोब्रा घरात शिरल्याचा भयानक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या सापाची लांबी ४-५ फूट नव्हे तर १६ फूट लांब आहे. ट्विटरवर हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.

हा व्हिडिओ उत्तराखंडमधील चोमू गावातील असल्याचं सांगण्यात येत आहे. किंग कोब्रा आढळल्यानंतर गावातील लोकांनी तातडीने वन विभागाला माहिती दिली. या सापाबद्दल माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी सापाला रेस्क्यू केले. अंगावर काटा येणारा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (Latest Viral News)

१६ फुटाचा किंग कोब्रा पाहून वन विभागाचे कर्मचारी देखील चक्रावून गेल्याचे पाहायला मिळाले. या आधी देखील २०२० मध्ये अल्मोडा गावात किंग कोब्रा आढळला होता.

नेमकं काय घडलं?

दरम्यान, अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, विषारी साप हा गायीच्या गोठ्यात सापडला होता. साप (Snake) दिसल्याने गोठ्यातील गाय, बकरी आणि अन्य जनावरांमध्ये एकच भीती पसरली. त्यांच्या आवाजाने घरातील लोक गोठ्यात आले. तेव्हा त्यांना किंग कोब्रा दिसल्याने तेही घाबरले. त्यानंतर त्यांनी तातडीने वनविभागाला माहिती दिली.

या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने किंगा कोब्रा रेस्क्यू केला. त्यानंतर हा किंग कोब्रा जंगलात सोडून दिला. आतापर्यंत इतका मोठा साप बघितला नसल्याचे लोकांनी सांगितले. किंग कोब्रा पाहिल्यानंतर गावातील लोक दहशतीमध्ये आहे. (Snake Viral Video)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricket Match Explosion: क्रिकेट मॅच सुरू असताना भीषण स्फोट, संपूर्ण स्टेडिअम हादरले; एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

SCROLL FOR NEXT